बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: बुधवार, 3 जुलै 2024 (11:03 IST)

आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन

plastic beg
जगभरात 3 जुलैला International Plastic Bag Free Day रूपात साजरा केला जातो. या दिवसाला सुरु करण्याचा उद्देश प्लास्टिक बॅग चा उपयोग कमी करणे. तसेच यापासून सुरक्षित राहण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे होय. प्लास्टिकने पर्यावरणला नुकसान पोहचते. सोबतच आपल्या आरोग्यासाठी देखील घातक असते. 
 
प्लास्टिक आपल्या आरोग्यासाठी किती घातक आहे. लोकांमध्ये ही जागरूकता निर्माण करण्यासाठी या उद्देशाने आज हा दिवस जगभरात साजरा करण्यात येतो. आपण सर्वांनी प्लास्टिक पॉल्यूशनच्या गंभीर संकट बद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे. प्लास्टिक आपल्या सोबत येणाऱ्या जनरेशनला देखील प्रभावित करतो. आज कपड्यांपासून ते ब्यूटी प्रोडक्ट्स आणि पॅकेजिंग पर्यंत प्लस्टिकचा उपयोग केला जातो.  
 
अशी झाली प्लास्टिक बॅग फ्री डे ची सुरवात- 
इंटरनेशनल प्लास्टिक बॅग फ्री डे ची सुरवात वर्ष 2009 मध्ये जीरो वेस्ट यूरोप व्दारा केली गेली होती. प्लास्टिक बॅगचा उपयोग वर बंदी लावण्यासाठी ही थीम चालू करण्यात आली होती. जास्त करून प्लास्टिक बॅग सिंगल यूज प्लास्टिक पासून बनतात, जे पर्यावरणसोबत मनुष्य आणि जीवांना देखील नुकसान पोहचवतात. प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणामध्ये सर्वात मोठा रोल प्लास्टिक बॅगचा आहे. 
 
सिंगल यूज प्लास्टिक पासून बनलेल्या वस्तू आपल्या जलाशयांना दूषित करण्याचे काम करतात. रोज 2000 पेक्षा जास्त प्लास्टिक महासागर, नदी आणि तलावांमध्ये फेकले जातात. हे पाण्याला नुसतं दूषितरच करीत नाही तर त्यामधील जीवांना देखील घातक ठरते. प्लास्टिकची पिशवीला नष्ट होण्यासाठी 500 वर्षपर्यंतचा वेळ लागतो. 
 
प्लास्टिक बॅग फ्री ला  विश्व स्तर वर साजरा करण्यामागे एकमात्र उद्देश्य हा आहे की, लोकांना याच्या संकटाबद्दल जागृत करणे. छोट्या छोट्या प्रयत्नांनी तुम्ही प्लास्टिक आपल्या जीवनशैलीमधून काढून स्वतःला सुरक्षित करू शकतात. तसेच पर्यावरणाला देखील सुरक्षित करू शकतात.ज्याची सुरवात प्लॅस्टिकच्या जागी कापड किंवा कागदाच्या पेशवीपासून करावी. 

Edited By- Dhanashri Naik