सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: बुधवार, 5 जानेवारी 2022 (08:56 IST)

अनाथांची माय! सिंधुताई सपकाळ यांचे निधन

‘माई’ या नावाने सुपरिचित असणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचे निधन झाले असून त्यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा निरोप घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून सिंधुताई सपकाळ यांची यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांच्यावर गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
 
अनाथांची आई’ सिंधुताई सपकाळ यांचे हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले आहे. काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती. म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
 
सिंधुताई सपकाळ यांची ओळख अनाथांची माय म्हणून होती. भारतातील अनके अनाथ मुलांचे पालन पोषण त्यांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे केले. त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे.