गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

वैज्ञानिकांनी शोधले लव्ह हार्मोन

love hormones
वैज्ञानिकांना एक अनोखे संप्रेरक तयार करण्यात यश मिळाले आहे. मानवाच्या शरीरातील लव्ह हार्मोन म्हणून ओळखल्या जाणार्‍या ऑक्सिटॉक्सिन या संप्रेरकापासून ते तयार करण्यात आले आहे.
 
ऑक्सिटॉक्सिन हे संप्रेरक प्रसूतीकळांना समजूदारपणा वाढवण्यासाठी, समाजाप्रतीच्या भावना, ताणतणाव आणि चिंतेशी संबंधित भावनांवर नियंत्रण ठेवते. ऑस्ट्रेलियातील मार्कस् मुटेनथेलर यांनी यासंदर्भात माहिती दिली. ऑक्सिटॉक्सिनमुळे मज्जासंस्थेशी जोडणारे अनेक रिसेप्टर्स एकाच वेळी कार्यरत होतात. ज्यामुळे शरीरावर वाईट परिणाम ‍होऊ शकतात. 
 
ऑक्सिटॉक्सिनच्या मूलभूत साच्यात छोटे-छोटे बदल करुन शास्त्रज्ञांनी एक नवीन अणू तयार केला आहे. या नवीन बदलांमुळे ऑक्सिटॉक्सिनचा रिसेप्टर्सवर होणार परिणाम कमी होतो. ऑक्सिटॉक्सिनच्या मूळ जडघडणीमध्ये बदल करुन तयार करण्यात आलेले हे नवीन संप्रेरक ऑक्सिटॉक्सिन इतकेच प्रभावी आहे मात्र त्याचा रिसेप्टवर्सवर वाईट परिणाम होत नाही. यामुळे हृद्याशी संबंधित स्नायूंवर परिणाम होत नाही तसेच गर्भाशय अचानक आकुंचन पावण्याची समस्याही या नवीन संप्रेरकांच्या वापरामुळे उद्भवत नाही.