राजर्षी शाहू महाराज जयंती

Shahu Maharaj
Last Updated: रविवार, 26 जून 2022 (10:11 IST)
(१८७४-१९२२) : राजर्षी शाहू महाराजांचा जन्म २६ जुन १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. कागलचे जहागीरदार जयसिंगराव आबासाहेब घाटगे हे त्यांचे जन्मदाते वडील राधाबाई ही त्यांची जन्मदाती माता. शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. ते दहा वर्षांचे असताना कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी यांची राणी आनंदीबाई हिने १८ मार्च १८८४ रोजी त्यांना दत्तक घेतले व ते कोल्हापूर संस्थानाचे झाले.
जन्म : २६ जुन १८७४
मृत्यू : ६ मे १९२२
पूर्ण नाव : छत्रपती शाहू महाराज भोसले
वडील :आबासाहेब घाटगे
आई : राधाबाई
पत्नी :

महाराणी लक्ष्मीबाई भोसले

राजर्षी शाहू महाराज बालपण आणि शिक्षण
इ. स. १८८५ मध्ये त्यांना शिक्षणासाठी राजकोट येथे पाठविण्यात आले. तेथे त्यांनी चार वर्षे शिक्षण घेतले. त्यानंतर ते कोल्हापूरला परतल्यावर धारवाड येथे शिक्षणासाठी गेले. तेथे सर एस.एम. क्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकारभार, इतिहास, इंग्रजी भाषा इत्यादी विषयांचे शिक्षण घेतले. धारवाड येथे शिक्षण घेत असतानाच लक्ष्मीबाई यांच्याबरोबर एप्रिल १८९१ रोजी शाहू महाराजांचा विवाह झाला. शिक्षणक्रम संपल्यानंतर वयाच्या विसाव्या वर्षी २ एप्रिल १८९४ रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानच्या राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली.
छत्रपती शाहू महाराज महत्वाचे कार्य
१९०२ साली शाहू महाराजांनी “पाटबंधारे धोरण” घोषीत केले.
२६ जुलै १९०२ रोजी शाहू महाराजांनी कोल्हापुर संस्थानातील मागासवगीय लोकांसाठी ५० टक्के जागा राखीव / आरक्षीत ठेवल्या. आरक्षण बाबतचा हा जाहीरनामा ‘करवीर गैजेट” मधुन प्रकाशित करण्यात आला होता.
१९०५ साली शाहू महाराजांनी राजोपाध्याय यांची इनामें जप्त केली व छात्र जगतगुरुचे नवे पीठ निर्माण करुन मराठा जातीच्या “सदाशिव बेनाडीकर” यांची पीठाचे प्रमुख म्हणून नेमणुक करण्यात आली.
तसेच संस्थान मध्ये निरनिराळ्या जातीचे पुरोहीत निर्माण करण्याकरीता “पुरोहीत शाळा” निर्माण केल्या.
१९०६ मध्ये शाहु महाराजांनी “छत्रपती शाहू स्पिनींग व जिनींग मिल” स्थापन केली. (२००३ मध्ये महाराष्ट्र शासनाने ही मिल बंद केली आहे) 0 १९०६ साली शाहु महाराजांनी कोल्हापूर संस्थानात “रात्रशाळा” सुरु केल्या. तर १९०७ साली शाहु महाराजांनी मुलींसाठी रात्रशाळा सुरु केल्या.
१९०७ साली कोल्हापुरच्या पश्चिमेस ५५ किमी अंतरावर दाजीपुर जवळ भोगावती नदीवर धरण बांधुन त्याच्या जलाशयास महाराणी लक्ष्मीबाई” हे नाव देण्यात आले. या धरणाचे काम सबनीस या इंजिनीअर कडुन करुन घेण्यात आले. याच धरणाशेजारी शाहू महाराजांच्या मुलीच्या नावावर “राधानगरी” हे गाव बसविण्यात आले.
१९०८ साली शाहु महाराजांनी अस्पृश्यांसाठी “मिस क्लार्क” हे वस्तीगृह स्थापन केले.
२० मे १९११ रोजी शाहु महाराजांनी संस्थानामार्फत विद्याथ्यांना १५ टक्के शिष्यवृत्तीची घोषणा केली.
प्रसिद्ध करुन संस्थानातील मागासवर्गीय
१९११ साली शाहु महाराजानी शिंपी समाजाच्या मुलांसाठी “नामदेव वस्तीगृह” सुरु केले.
छत्रपती शाहू महाराज विशेषता
राजर्षी शाहू महाराजांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी ‘सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष’ अशा शब्दांत यथार्थपणे गौरविलेले आहे.यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

हाय-टेक सिक्युरिटीसह Moto G32 ची आज पहिली विक्री,वैशिष्ट्ये ...

हाय-टेक सिक्युरिटीसह Moto G32 ची आज पहिली विक्री,वैशिष्ट्ये जाणून घ्या
Motorola च्या हाय-टेक सुरक्षा वैशिष्ट्यासह Moto G32 स्मार्टफोनची आज भारतात पहिली विक्री ...

Edible Oil Price : खाद्यतेल आणखी स्वस्त होणार !

Edible Oil Price : खाद्यतेल आणखी स्वस्त होणार !
वाढत्या महागाई दरम्यान सर्वसामान्यांना पुन्हा एकदा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ...

FIFA : FIFA ने भारतीय फुटबॉल महासंघाला निलंबित केले

FIFA : FIFA ने भारतीय फुटबॉल महासंघाला निलंबित केले
जगातील सर्वात मोठी फुटबॉल संघटना म्हणजेच FIFA ने मंगळवारी अखिल भारतीय फुटबॉल महासंघ ...

Vinayak Mete : विनायक मेटे यांच्या मृत्यू बाबत मेटेंच्या ...

Vinayak Mete : विनायक मेटे यांच्या मृत्यू बाबत मेटेंच्या पत्नीकडून महत्त्वाचा खुलासा!
Vinayak Mete Death Update :विनायक मेटे यांच्या अपघाताच्या घटनेनंतर आता अनेक प्रश्न ...

Jammu :ITBP बसला अपघात, बस दरीत कोसळली, चार जवानांच्या ...

Jammu :ITBP बसला अपघात, बस दरीत कोसळली, चार जवानांच्या मृत्यू, अनेक जवान जखमी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. पहलगामच्या चंदनबाडीमध्ये ...