रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

बीएमडब्ल्यू पेक्षा महागडा साप

सोनेरी रंग असलेल्या रेड सँड बोआ नावाच्या या सापाची किंमत काळ्या बाजारात बीएमडब्ल्यू एक्स-6 (1.2 कोटी रूपये) आणि मर्सिडीज बेंज एस क्लास (1.19 कोटी रूपये) या आलिशान गाड्यांपेक्षा जास्त आहे. जवळपास दीड ते दोन कोटींमध्ये या सापची विक्री होते. याच कारणामुळे तस्करांसाठी या सापाची डिमांड खूप जास्त आहे.
 
वजन जितकं जास्त तितकं काळ्या बाजारात सापाची किंमत जास्त असेत. त्यामुळे तस्कर या सापाला स्टीलच्या गोळ्या खायला देतात. त्यामुळे या सापाचं वजन वाढतं. बिहारच्या अररियामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दिवसांपूर्वी एका तस्कराकडून दोन साप पकडले. या सापांची किंमत 3 कोटींपेक्षाही जास्त असल्याचं बोललं जात आहे.
 
चीनमध्ये ताकद वाढवण्यासाठी हा साप येथे खाल्ला जातो. हा साप खाल्ल्याने माणूस नेहमी तरूण राहतो असा आखाती देशांमध्ये समज आहे.
 
तसेच या सापामुळे दुर्धर आजार बरे होतात असंही येथे बोललं जातं. भारतात या सापाला धनदेवता कुबेरसोबत जोडलं जातं. या सापाचं दर्शन भारतात शुभ मानलं जातं, या शिवाय तंत्रमंत्रामध्येही रेड सँड बोआ या सापाचा उपयोग केला जातो.