मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: बुधवार, 10 एप्रिल 2024 (15:24 IST)

डॉ.आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना आपले गुरू का मानले?

jyotiba phule
महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल, १८२७ ला पुण्यामध्ये माळी कुटुंबात झाला होता. त्यांनी देशामध्ये दलित आणि महिलांना सामाजिक न्याय मिळण्यासाठी खूप संघर्ष केला. याच कारणामुळे संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा फुले यांना आपले तिसरे गुरु मानायचे. वाचा त्यांची प्रेरणादायक कहाणी 
 
महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव सर्वात महान समाज सुधारकांमध्ये घेतले जाते. ते आपले पूर्ण जीवन अस्पृश्यांना न्याय, निरक्षरता, महिलांवर होणारे अत्याचार यांसारख्या सामाजिक समस्यांविरुद्ध लढत राहिले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी भारतासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचे व्यक्तिमत्व खूप तेजस्वी होते. 
 
महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म पुण्यामध्ये ११ एप्रिल, १८२७ ला झाला. त्यांचे पूर्ण नाव ज्योतिबा गोविंदराव फुले होते. त्यांचे कुटुंबीय माळीचे काम करायचे. यामुळेच त्यांच्या नावापुढे फुले हे उपनाव जोडले गेले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वडिलांचे नाव होते गोविंदराव आणि आईचे नाव होते चिमणाबाई. महात्मा ज्योतिबा फुले फक्त एक वर्षाचे असतांना त्यांच्या आईला देवाज्ञा झाली. मग सगुणाबाई नावाच्या एका महिलेने त्यांचा सांभाळ केला. 
 
महात्मा ज्योतिबा फुले यांची प्राथमिक शिक्षण मराठीमध्ये झाले. त्यानंतर १८४० मध्ये त्यांचा विवाह सावित्रीबाईंशी झाला. ज्या सावित्रीबाई फुले नावाने ओळखल्या जातात. सावित्रीबाई फुले पुढे जाऊन एक महान, थोर समाजसेविका बनल्या. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी दलितांना मान आणि महिलांचे शिक्षण यासाठी खूप प्रायत्न केले. महिलांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी अतिशय प्रयत्न केले. त्यांनी १८४८ मध्ये महिलांसाठी पहिला शाळा सुरु केली. त्यावेळी त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. 
 
गरिबांना आणि दलितांना सामाजिक न्याय मिळावा म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी १८७३ मध्ये 'सत्यशोधक समाजाची' स्थापना केली. सामाजिक न्याय प्रति त्यांचा संघर्ष पाहून त्यांना १८८८ मध्ये महात्मा ही उपाधी दिली गेली. 
 
कशी मिळाली प्रेरणा- 
१८१८ मध्ये मराठे आणि इंग्रजांमध्ये ‘भीमा-कोरेगांव युद्ध’ झाले. या युद्धामध्ये इंग्रजांचा विजय झाला. असे बोलले जाते की, या युद्धामध्ये इंग्रजांच्या बाजूने महार समुदायाच्या सैनिकांनी आपल्या अस्मितेसाठी मोठ्या संख्येने भाग घेतला होता, ज्यांना शूद्र समजले जायचे. 
 
यानंतर दलितांच्या जीवनात काही खास बदल झाला नाही. हळू हळू इसाई धर्मियांनी त्यांना शिक्षणाशी जोडले. असे सांगितले जाते की, महात्मा ज्योतिबा फुले जेव्हा सात वर्षाचे होते. त्यांनी शाळेत जायला सुरवात केली होती. पण सामाजिक दबावामुळे त्यांचे वडील हतबल झालेत व त्यांना आपली शाळा सोडावी लागली. 
 
शिक्षण सुटल्यानंतर, महात्मा ज्योतिबा फुले हे आपल्या वडिलांसोबत शेतात काम करू लागले. पण त्यांची जीज्ञासा आणि प्रतिभा मुळे उर्दू-फारसीचे विद्वान गफ्फार बेग आणि ईसाई पादरी लिजीट यांना आकर्षित केले. त्यांनी गोविंदरावांना समजावले की, आपल्या मुलाला म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांना शाळेत पाठवा. गोविंदरावांनी त्यांचे म्हणणे ऐकले. मग महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिक्षण परत सुरु झाले. 
 
जसे की, त्यांचे प्राथमिक शिक्षण मराठीमध्ये झाले होते. १८४७ मध्ये त्यांनी स्कॉटिश मिशनच्या इंग्रजी शाळेमध्ये प्रवेश घेतला. ज्यामध्ये त्यांना आधुनिक शिक्षणाच्या शक्तीचा अंदाज लागला. मग त्यांनी त्यांच्या हृदयात आणि डोक्यामध्ये न्याय आणि स्वतंत्रतेच्या विचारांनी आपले घर बनवले. आता ते प्रत्येक गोष्टींमध्ये तर्क आणि न्याय शोधायला लागले. 
 
महात्मा ज्योतिबा फुले यांना जाणीव झाली की, जर भारतामध्ये दलित आणि महिलांना पुढे न्यायचे असले तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. याच विचारांमुळे त्यांनी पहिले सावित्रीबाई फुले यांना शिक्षणाशी जोडले आणि त्यांना जाणीव करून दिली की, पुरुष आणि महिला हे दोन्ही समान आहे. या दोघांनी चालू केलेल्या या उपक्रमात सगुणाबाई, फातिमा शेख सारख्या अनेक महिलांनी त्यांना भरपूर साथ दिली. 
 
हा विचार सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी १८४८ मध्ये मुलींसाठी पहिली महिला शाळा सुरु केली आणि हजारो वर्षांपासून शोषण सुरु असलेला समाजासाठी उघडपणे धार्मिक ग्रंथांना आव्हान दिले. या प्रकारे सावित्रीबाई फुले या पुण्यामधील फक्त शाळेच्या नाही तर, संपूर्ण भारतवर्षाच्या पहिल्या महिला शिक्षिका बनल्या. 
 
महात्मा ज्योतिबा फुले १८७३ मध्ये मूळ रूपाने मराठीमध्ये लिहलेले आपले पहिले पुस्तक 'गुलामगिरी' मध्ये धार्मिक ग्रंथ, देव-देवता, संमतशाहीच्या ताकदीच्या खोट्या प्रभुत्वावर घाव घालत, अस्पृश्यांची हीन भावना त्यागून, आत्मसन्मानाने आपले जीवन जगण्यासाठी प्रेरित केले. या पुस्तकात त्यांनी माणसांमध्ये होणाऱ्या भेदभावाला जन्म देणाऱ्या विचारांवर औपचारिक पणे हल्ला केला आहे.   
 
सोबतच महिलांच्या शिक्षणाला घेऊन महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार होते की, "पुरुषांनी महिलांना शिक्षणापासून फक्त याकरिता दूर ठेवले आहे की, त्यांनी कधी आपले अधिकार समजून घ्यायला नको". 
 
महात्मा ज्योतिबा फुले यांनी फक्त महिलांना शिक्षणाशी जोडण्याचा प्रयत्न केला नाही तर विधवांसाठी देखील  आश्रम बनवलेत. विधवा-पुनर्विवाहासाठी प्रयत्न देखील केले. तसेच बालविवाह थांबावे म्हणून देखील प्रयत्न केलेत. 
 
अनेक वर्षांच्या संघर्षानंतर त्यांना जांबिव झाली की, जर दलितांना आणि महिलांना मुख्यधाराशी जोडायचे असेल तर, जाती व्यवस्थाला धार्मिक आणि अध्यात्मिक आधार देणाऱ्या व्यवस्थांवर घाव घालून या प्रथा नष्ट कराव्या लागतील. याकरिता त्यांनी २४ सप्टेंबर १८७३ मध्ये 'सत्यशोधक समाज' स्थापन केले. याचा मूळ उद्देश संपूर्ण पौराणिक मान्यतांना विरोध करून समाजाला नवीन वातावरणाशी ओळख करून देणे. 
 
महात्मा ज्योतिबा फुलेंना, गुरु मानायचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
१८९१ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्म पूर्वी काही महिने अगोदर महात्मा फुले अनंतात विलीन झाले होते. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बुद्ध आणि कबीर यांसोबत महात्मा ज्योतिबा फुलेंना आपले गुरु मानायचे. 
 
बाबासाहेबांनी इंग्रजी इतिहासकार व्दारा लिहलेल्या भारताचा खोटा इतिहास आणि घटनांविरुद्ध लिहलेले आपले पुस्तक 'शूद्र कोण होते?' महात्मा ज्योतिबा फुलेंना समर्पित करून लिहले की, त्यांनी हिंदू समाजातील छोटया छोटया जातीतील लोकांना मोठया जातींच्या प्रति आपल्या गुलामी भावनेच्या प्रति जागे केले आणि सामाजिक लोकतंत्राच्या स्थापनेला इंग्रज शासनाकडून मुक्ती मिळवणे देखील गरजेचे आहे हे सांगितले. हे पुस्तक महात्मा फुलेंच्या स्मृतीला समर्पित. 
 
महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल एक नवीन विचार दिला. १८८२ मध्ये त्यांनी लिहलेल्या 'शेतकर्‍याचा असुड' आपल्या या पुस्तकात शेतकऱ्यांची दुर्दशा लिहली आहे. 
 
ते पुस्तकात लिहतात की, “इंग्रज अधिकारी, ब्राम्हणांच्या प्रभावामध्ये येऊन  आपल्या जवाबदारीपासून पळ काढतात. तसेच ते शेठ-सावकार यांसोबत मिळून शेतकऱ्यांचे शोषण करतात. व इथून धन एकत्रित करून त्यांच्या देशात युरोपमध्ये पोहचवतात. बिचारा लाचार शेतकरी हे सर्व सहन करीत आहे. 
 
२८ नोहेंबर १८९० ला ज्योतिबा फुले यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांनी ‘सत्यशोधक समाज’ ची जवाबदारी सांभाळी आणि सामाजिक बदलसाठी आपली लढाई सुरूच ठेवली. 
 
वास्तवमध्ये, सामाजिक न्यायच्या  संदर्भामध्ये ‘सत्यशोधक समाज’ द्वारा दाखवलेले रस्ते आज दीडशे वर्षानंतर पण उपयुक्त आहे. 

Edited By- Dhanashri Naik