गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 3 जून 2021 (11:14 IST)

World Bicycle Day : झाली ओळख "तिची"अगदी लहानपणी

झाली ओळख "तिची"अगदी लहानपणी गडे,
समोरच्या टोपलीत बसून आमची स्वारी फिरे इकडेतीकडे!
मग आली तीन चाकी ची, शान की सवारी,
भावंडा सोबत त्यावर कसरत व्हायची सारी,
दोन चाकी शिकताना मात्र, नाकी आला दम,
कित्ती दा फुटले टोंगळे, लावला मलम,
दांडा ची सायकल चालवायला शिकलो,
जो घरी येईल त्यास, चक्कर मागीत फिरलो,
शाळेत सायकल ने जायचे स्वप्न मोठ्ठं होतं,
घेऊन द्या हो नवी, आमचं रोजचं तुणतुण होत,
मिळाली बाबा एकदाची, स्वर्ग दोन बोटं उरलं,
मैत्रिणी सोबत शाळेत जायचं स्वप्न पूर्ण झालं !
कॉलेज मध्ये ही "तिने"दिली साथ खूप मोलाची,
मज्जाच होती सख्या सोबत चक्कर मारायची,
सुटली की हो साथ तीची अकस्मात,
गाडीने घेतली तीची जागा,एका फटक्यात,
वय वाढतंय आता, म्हणून व्यायामा साठी आठवण तिची,
पाय मजबुत ठेवायचेत, घ्या पुन्हा साथ तिची,
जिम मध्ये जाऊन बसल्या जागेवर चालवतोय सायकल,
आठवतंय आता तिच्या सोबतचे ते अनमोल पळ,
पिढी दर पिढी दिली साथ तिनं, इमाने इतबारे,
फक्त हवा भरा, बाकी न कोणते तिचे नखरे!
अशी माझी गुणाची सखी आहेस ग तू!
जीवनात तोल सांभाळून चालायला शिकवणारी तूच तू!!
.......अश्विनी थत्ते.