मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: शनिवार, 31 डिसेंबर 2022 (09:46 IST)

जळगाव जनता सहकारी बँकेत विविध पदांसाठी बंपर भरती

jobs
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी चालून आलीय. जळगाव जनता सहकारी बँकेत विविध पदांसाठी मोठी भरती आयोजित केली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2023 पर्यंत आहेत.
JJSB Bharti 2023 | एकूण जागा :
 
या पदांसाठी होणार भरती?
बँकिंग अधिकारी (लिपिक श्रेणी) आणि प्रोबेशनरी ऑफिसर (अधिकारी ग्रेड)/परिविक्षाधीन अधिकारी या पदांसाठी ही भरती होणार आहे.
 
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
बँकिंग अधिकारी (लिपिक श्रेणी) – प्रथम श्रेणीसह पदवीधर 60% आणि त्याहून अधिक किंवा समतुल्य ग्रेड किंवा LLB/BE गुणांसह 60% आणि त्यावरील किंवा समतुल्य ग्रेड.
प्रोबेशनरी ऑफिसर (अधिकारी ग्रेड)/परिविक्षाधीन अधिकारी – प्रथम श्रेणीसह पदव्युत्तर पदवीधर जे 60% आणि त्याहून अधिक गुण किंवा समतुल्य ग्रेड किंवा LLB/BE 60% आणि त्याहून अधिक किंवा समतुल्य गुण.
 
वयोमर्यादा : 21 ते 28 वर्षापर्यंत
 
अर्ज शुल्क :
बँकिंग अधिकारी – Rs. 600/-
प्रोबेशनरी अधिकारी – Rs.1,300/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जानेवारी 2023
 
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :
– उमेदवाराने दिलेल्या कालावधीत विविध नमुन्यात ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहेत, इतर पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज जाहिरातीत दिलेल्या लिंक वरून करायचे आहेत.
– उमेदवाराच्या म्हणण्यानुसार परीक्षा केंद्र बदलण्यात येणार नाही. परीक्षा केंद्रावर परीक्षेला जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही.
– ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी करून अर्ज शुल्क भरायचे आहे,त्यासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.
– परीक्षा परीक्षा केंद्र बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवलेला आहे.
– उमेदवाराला दोन्ही पदांसाठी अर्ज करायचा असल्यास दोन्ही पदांसाठी स्वतंत्रपणे अर्ज करावा लागेल. दोन्ही पदांसाठी लेखी परीक्षा तसेच मुलाखती देखील होतील.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor