सोमवार, 1 सप्टेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (10:25 IST)

CDAC Recruitment 2021 100 पदांसाठी भरती

CDAC Recruitment 2021
C-DAC मध्ये विविध पदांसाठी भरती होत आहे. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग मध्ये प्रोजेक्ट इंजिनीअर्स पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला एक वर्षासाठी नियुक्ती दिली जाईल. प्रकल्पाच्या गरजेनुसार या नियुक्तीला तीन वर्षांपर्यंत मुदतवाढ दिली जाऊ शकेल. 
इच्छुक आणि योग्य उमेदवार १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात.
 
पदांची तपशील 
 
पोस्ट कोड - पदाचे नाव - मासिक वेतन - रिक्त पदे
 
PE:Devp - प्रोजेक्ट इंजिनीअर - ४० पदे
 
PE: SDevp - प्रोजेक्ट इंजिनीअर - ४० पदे
 
PT:JDevp - प्रोजेक्ट टेक्निशिअन- २० पदे
 
 
 
शैक्षणिक पात्रता
AICTE / UGC मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून किंवा स्वायत्त विद्यापीठातून इंजिनीअरिंग पदवी असणे आवश्यक आहे. 
 
अधिक माहिती भरतीसंदर्भातील नोटिफिकेशनमध्ये वाचावी.
https://cdac.in/index.aspx?id=ca_AdvtPEPT_2021
 
निवड प्रक्रिया 
ऑनलाइन मुलाखतींद्वारे निवड केली जाईल. मुलाखतींच्या वेळापत्रकासाठी उमेदवारांनी C-DAC चे संकेतस्थळ नियमितपणे पाहावे.
 
या प्रकारे करा अर्ज
[email protected] या ईमेलवर उमेदवारांना आपला अर्ज पाठवायचा आहे.
 
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
https://cdac.in/index.aspx?id=ca_application_form_cdacm