मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: सोमवार, 6 जुलै 2020 (14:41 IST)

या 10 क्षेत्रातील नोकऱ्यांना मागणी वाढली

कोरोनाचे संक्रमण (Coronavirus) रोखण्यासाठी जगभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना नोकरी गमवावी लागली आहे. जगासमोर सध्या बेरोजगारीचे मोठे संकट आहे. सध्या अनेक लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत. मात्र आताच्या काळातील नोकऱ्यांसाठी काही विशेष कौशल्य असणे देखील आवश्यक (job requirement) आहे. यामध्ये अशा काही कौशल्यांचा (Skills)समावेश होतो, जी तुम्ही ऑनलाइन देखील शिकू शकता.
 
मायक्रोसॉफ्ट आणि लिंक्डइन (Microsoft and LinkedIn) ने अशा टॉप 10 जॉब्सबाबत शोध घेतला आहे ज्यांची मागणी वाढत आहे. त्याकरता त्यांनी नोकरी करण्यासाठी इच्छूक लोकांना मोफत ऑनलाइन ट्रेनिंग देण्याची ऑफर देऊ केली आहे.
 
LinkedIn चे मुख्य कार्यकारी अधिकारी Ryan Roslansky यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये अशी माहिती दिली आहे की, 'आम्ही कोव्हिड-19 मुळे नोकरी गेलेल्या लोकांची मदत करू इच्छितो आणि नवीन नोकरीसाठी आवश्यक कोशल्य मोफत शिकवून नवीन नोकरी मिळवण्यासाठी त्यांची मदत करू इच्छितो. अशाप्रकारे इच्छूक नोकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन संधी उपलब्ध करून देऊन आम्ही आमचे कर्तव्य निभावत आहोत'.
 
या व्यवसायिक नेटवर्किंग साइटचे असे म्हणणे आहे की, त्यांनी या काळात त्यांच्या नेटवर्कशी 69 कोटी प्रोफेशनल्स, 5 कोटी कंपन्या, 1.1 कोटी जॉब लिस्ट, 36 हजार स्किल्स आणि 90 हजार स्कूल्स जोडले गेले आहेत. ज्यांच्या मदतीने मागणीत असणारे स्किल्स, उदयोन्मुख नोकऱ्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील जॉब पॅटर्न (job requirement) ओळखला आहे.
 
या आकड्यांच्या आधारे कोरोना व्हायरस पँडेमिक दरम्यान 10 असे विशेष जॉब्स आहेत जे खूप मागणीमध्ये आहेत. आणि पुढील 4 वर्षात याची मागणी वाढत राहील.
 डिजिटल मार्केटर
 आयटी सपोर्ट/हेल्प डेस्क
 ग्राफिक डिझायनर
 फायनान्शियल अनालिस्ट
 डाटा अनालिस्ट
 सॉफ्टवेअर डेव्हलपर
 प्रोजेक्ट मॅनेजर
 सेल्स रिप्रेजेन्टेटिव्ह