शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020 (17:12 IST)

अॅमेझॉन कंपनीत नोकरीची संधी

Amazon कंपनीने तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली आहे. यामध्ये अर्धा वेळ किंवा पूर्णवेळ काम करु शकता. यातून महिन्याला ५० हजार रुपये कमवू शकता.  
 
Amazonला त्याचे उत्पादन वितरीत करण्यासाठी हजारो डिलिव्हरी बॉयची आवश्यकता आहे. डिलिव्हरी बॉयला कंपनीच्या गोदामातून वस्तू दिल्या जातात. त्या वस्तू दिलेल्या पत्त्यावर देण्याचा असतात. असे काम करणाऱ्या तरुणांना कंपनी रोजगाराची संधी उपलब्ध करुन देत आहे. या नोकरीत कोणताही दबाव नाही. जर आपण दिवसभर काम करू शकत नाही तर अर्धवेळ नोकरीचीही तरतूद आहे.
 
Amazon दरमहा डिलिव्हरी बॉयला नियमित पगार देते. कंपनी आपल्या डिलिव्हरी मुलाला अनुभवानुसार पगार देते. जर एका डिलिव्हरी बॉयने एका दिवसात १५० किंवा अधिक पॅकेट्स वितरित केली तर सहज दरमहा ५० हजारांहून अधिक पगार सहज मिळवू शकता.
 
अ‍ॅमेझॉनचे पॅकेट्स किंवा पार्सल वितरीत करण्यासाठी डिलिव्हरी बॉयला जास्त शिक्षणाची गरज नाही. दहावी पास असेल तरीही त्याला काम करण्याची संधी मिळते. दहावी पास देखील येथे सहज नोकरी मिळवू शकेल. परंतु अधिक पात्रताधारक तरुण असेल तर त्याला तसा पगार वाढण्याची शक्यता जास्त असते. आपण डिलिव्हरी बॉय जॉबसाठी थेट अ‍ॅमेझॉनच्या बेवसाईटवर https://logolog.amazon.in/applynow थेट अर्ज करू शकता.