NHM Recruitment 2020: बंपर जागा, थेट मुलाखत पद्धतीने होणार निवड
नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. राजस्थान सरकारच्या वैद्यकीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग संचालनालयाने अनेक पदांसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. जर आपणास देखील या भरती प्रक्रियेचे भाग व्हायचे असल्यास तर जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटच्या तारखे पासून अर्ज करण्याची पद्धत आणि अधिकृत संकेतस्थळ(वेबसाइट)-
पदाची संख्या आणि नाव -
या भरतीच्या माध्यमातून कम्युनिटी हेल्थ ऑफिसर (सामुदायिक आरोग्य अधिकारी ) चे एकूण 6310 रिक्त असलेले पद भरले जातील.
महत्त्वाच्या तारखा -
शेवटची तारीख - 16 सप्टेंबर 2020
वयोगट -
अर्जदाराचे वय 18 - 45
शैक्षणिक पात्रता -
अर्जदार मान्यताप्राप्त विद्यापीठातून हेल्थ मध्ये बीएससी किंवा नर्सची पदवीधरी असणे अनिवार्य आहे. शैक्षणिक पात्रतेसंबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांना अधिकृत सूचना वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
वेतनमान -
कम्युनिटी हेल्थ ऑफिसर - 25000 रुपये दर महिना.
अर्जाची फी -
सामान्य वर्गासाठीच्या उमेदवारांसाठी - 400 रुपये
ओबीसी आणि एससी/एसटी श्रेणीच्या उमेदवारांसाठी - 300 रुपये.
अर्ज प्रक्रिया -
इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार विभागाच्या अधिकृत संकेत स्थळावर rajswasthya.nic.in जाऊन भेट देऊ शकतात.
नोकरीचे स्थळ -
राजस्थान
निवड प्रक्रिया -
उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.