शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Updated : शनिवार, 25 जुलै 2020 (20:56 IST)

Traditional Dish : खुसखुशीत बाटी-बाफले बनविण्याचा या 15 टिप्स जाणून घेऊ या..

डाळ किंवा वरण बाटी हे एक पारंपरिक व्यंजन आहे, जी माळवा /मध्यप्रदेश तसेच पूर्ण भारतात लोकप्रिय आहे. बाटी बनविणे काही अवघड काम नाही, प्रत्येक जण ते बनवू शकतो. फक्त खालील दिलेल्या सोप्या टिप्स वापरून बघा आणि खुसखुशीत बाटी बनवा. जे आपल्याला नक्की आवडेल.
 आपल्यासाठी काही सोप्या टिप्स -
1 बाटी किंवा बाफले करताना नेहमी गव्हाचं जाड पीठच वापरा. जर जाड पीठ नसल्यास तरी अर्ध साधं पीठ आणि मध्यम जाड पीठ वापरा.
2 बाटी बनविताना एक चतुर्थांश दही वापरावं.
3 बाटीची कणीक माळताना मीठ आणि मोयन बरोबरच थोडी साखर घाला असे केल्याने बाटी फुगते.
4 बाटी करताना मोयन घाला. तेल किंवा तुपामधून काहीही घालू शकता.
5 बाटी बनविताना आपल्या आवडीनुसार ओवा, जिरं किंवा शोप आवर्जून घाला. या मुळे बाटीची चव वाढते.
6 बाटीची कणीक माळताना नेहमीच कोमट पाणी वापरावं.
7 बाटी बनविण्याचा एक तासापूर्वीच कणीक मळून ठेवावी.
8 बाटीला ओव्हन मध्ये मंद आंचेवर ठेवावं.
9 बाटीला तूप लावताना गरम बाटीला कापड्यानं धरून हाताने दाबा आणि मधून दोन भाग झाल्यावरच त्याला तुपात बुडवून द्या.
 
बाफले बनवायचे असल्यास जाणून घेऊ या काय करावयाचे आहे-
10 जर आपल्याला बाफले बनवायची इच्छा असल्यास पूर्वीच कणीक मळून बाटी बनवून घ्या.
11 मग एका पातळ किंवा जाड तळ असलेल्या भांड्यात गरम पाणी करून ठेवा.
12 पाणी उकळल्यावर यामध्ये तयार केलेल्या बाटीला टाकून चांगल्या प्रकारे उकळवून घ्या. मधून मधून ढवळत राहा.
13 15 ते 20 मिनिटा नंतर बाटी पाण्याच्या वर तरंगेल त्यावेळी बाटीला गरम पाण्यातून काढून घ्या आणि ताटात थंड होण्यासाठी ठेवा.
14 उकळवून थंड केलेल्या बाट्यांना ओव्हन गरम करून मंद आँचे वर शेकून घ्या.
15 बाफल्यांचे 2 तुकडे करून त्यांना साजूक तुपात बुडवून गरम वरण आणि हिरव्या चटणी सोबत सर्व्ह करावं.
 
विशेष : या सर्व टिप्सचे आपण अनुसरणं करून बाटी किंवा बाफले करून नक्की बघा, आपल्या बाट्या आणि बाफले खुसखुशीत बनतात. आणि कुटुंबातील सदस्य आपली प्रशंसा नक्की करणार.