सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019 (09:18 IST)

पोलिस भरती : तरुण उमेदवार हे आपल्या नोकरीच्या मागण्यांचं निवेदन घेऊन मुंबईला पळत निघाले

पोलिस शिपाई पदाच्या भरती प्रक्रीयेत करण्यात आलेले नवीन बदल रद्द करावे सोबतच जुन्याच निकषा नुसार परीक्षा घेण्यात यावी या मागणीसाठी पुण्यात नदीपात्रातून जिल्हाधीकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला होता, मोर्चेकरांमधील काही तरुण हे आपल्या मागण्यांचं निवेदन घेऊन मुंबईला पळत निघाले असून, 11 फेब्रुवारी रोजी ते मुंबईतील आझाद मैदान येथे पोहचतील, शासनाने पोलीस भरतीतील नियमांमध्ये बदल केले असून, या नवीन बदलानुसार पहिल्यांदा शंभर गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यातनंतर 1 : 5 याप्रमाणे शारीरिक क्षमता चाचणीस मुले पात्र ठरविण्यात आली आहेत. शारीरीक क्षमात ही फक्त 50 गुणांची होणार आहे. त्यामुळे राज्यातील पोलीस दलास शारीरिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांची उपलब्धता होण्याबाबत शंका आहे. निकष परीक्षेच्या अगदी तोंडावर बदलल्याने वर्षानुवर्षे तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये चिंतेचे व नैराश्याचे वातावरण आहे. त्यामुळे तरुणांनी संताप व्यक्त करत आहेत म्हणून ते निवेदन घेऊन पळत निघाले आहेत. परीक्षा पास होणारे सिलेक्ट होतील मात्र जे अनेक दिवस आणि वर्ष मेहनत करत मैदानी मेहनत करत आहेत ते डावलले जातील अशी भीती मुलांना आहे.