सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: बुधवार, 6 जानेवारी 2021 (10:22 IST)

बिहार राज्य आरोग्य सोसायटी भरती: स्टाफ नर्सच्या पदासाठी भरती, एका क्लिकने अर्ज करा

Bihar State Health Society Recruitment 2020-21: बिहार आरोग्य सोसायटीने स्टाफ नर्स च्या 4,102 पदांवर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत, पात्र आणि इच्छुक उमेदवार विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर statehealthsocietybihar.org 20 जानेवारी 2021 च्या पूर्वी अर्ज करू शकतात. विभागाने जारी केलेल्या अधिकृत सूचनेनुसार, निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 20 हजार रुपये पगार देण्यात येणार आहे.
 
शैक्षणिक पात्रता- 
नर्सिंग कौन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त कोणत्याही नर्सिंग शाळा/संस्थेमधून GNM (जनरल नर्स आणि मिडवाईफरी)अभ्यासक्रम आणि उमेदवारांची नोंदणी करणे अनिवार्य आहे.
किंवा 
बी एससी नर्सिंग कोणत्याही मान्यता प्राप्त शाळेतून/संस्थेतून उमेदवार नर्सिंग कौन्सिल मध्ये नोंदणी करणे अनिवार्य आहे 
किंवा 
उमेदवाराचे कोणत्याही मान्यता प्राप्त शाळेतून किंवा संस्थे मधून पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग अभ्यासक्रम आणि नर्सिंग कौन्सिल सह नोंदणी करणे आवश्यक आहे. 
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सूचना वाचण्याचा सल्ला दिला जात आहे.
 
वय मर्यादा- 
अनारक्षित/ईड्ब्ल्यूएस-37 वर्ष 
बीसी / एमबीसी (महिला / पुरुष) - 40 वर्षे
अनुसूचित जाती / जमाती (महिला / पुरुष) - 42 वर्षे 
अनारक्षित / ईडब्ल्यूएस (महिला) - 40 वर्षे
वयाची सवलत नियमांच्या आधारे दिली जाणार.

अधिक माहितीसाठी अधिकृत संकेत स्थळावर तपासा. 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे https://shsb19.azurewebsites.net/#no-back-button क्लिक करा.