रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. सखी
  4. »
  5. फॅशन
Written By मनोज पोलादे|

उन्हाळ्यात चेहरयाचे सौदर्य खुलविण्यासाठी

उन्हाळा म्हटले की अंगाची लाही लाही करणारे रखरखते उन आलेच. तीव्र उन्हामुळे त्वचा शुष्क होण्यासोबतच काळवंडते. निस्तेज होते. भरपूर घाम येत असल्याने बाहेर फिरले की चेहर्‍यावर धुळीची पुटे चढतात.

तेव्हा उन्हाळ्यात त्वेचची निगा राखणे कमप्राप्तच ठरते. सर्वांत सोपा व सहज उपाय म्हणजे बाहेरून फिरून आल्यावर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करावा.

दिवसातून चार-पाचदा चेहर्‍यावर थंड पाणी शिंपडल्यास त्वचेस ओलावा प्राप्त होण्यासोबतच जळजळत्या डोळ्यांनाही दिलासा मिळत असते.

उन्हात जास्त फिरल्याने काळवंडलेली त्वचा स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय म्हणजे एका लिंबाच्या रसात तीन-चार चमचे दुध मिसळून थोडा खायचा सोडा घालून मिश्रण मिसळून घ्यावे व चेहरयावर लेप लावावा.

साधारणतः तीस मिनिटे राहू दिल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा. उन्हाच्या अतिरेकामुळे शरीराची उष्णता वाढून ओठ व तळहाताची साल निघण्याचा त्रास बहुतेकांना होत असतो.

यावर उपाय म्हणजे बाजारातून चांगल्या ब्रँडचा खा‍त्रीलायक मॉयश्चरायझरचे क्रिम आणून ओठ व तळहाताना क्रिमने मसाज करावा. समारंभ व सोहळ्यांमध्ये आपल्याला मिरवायचे असल्याने सुंदर दिसावे ही आं‍तरीक इच्छा ‍असते.

उपायापेक्षा प्रतिबंध परिणामकारक. सूर्यप्रकाशातील अल्ट्रा व्हायोलेट किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी चेहरा पांढर्‍या रूमालाने झाकून घ्यावा. पायदळ जायचे असल्यास छत्रीचा वापरही करू शकतो.

परंतु, छत्री वापरणे सगळ्यांसाठी सहज प्रक्रिया नसते. दिवसभर उन्हात फिरल्याने त्वचेवर डाग पडल्यास नैसर्गिक व घरगुती उपाय म्हणजे आंबा व जांभळाची पाने बारीक वाटून रस काढावा.

या रसात हळद घालून मिश्रण एकजीव करावे व त्याने चेहरा चोळावा. उन्हामुळे त्वचा रखरख होत असते. यासाठी जवळच्या औषधाच्या दुकानातून गुलाब पाण्याची बाटली आणावी.

घरी लिंबू असतोच. रात्री निवांतपणे लिंबाचा रस व गुलाबपाणी एकत्र करून चेहर्‍यावर लावावे. सकाळी उठल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवावा. नियमित ही कृती केल्यास चेहरा निश्चितच सतेज झाल्याशिवाय राहणार नाही.