1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Updated : सोमवार, 30 मे 2016 (11:46 IST)

ड्रेसिंग टेबलसाठी स्मार्ट टिप्स

तुमच्या ड्रेसिंग टेबलमध्ये ब्लो ड्राय हेअर क्लिप्स असायलाच हव्यात. या क्लिप्सच्या सहाय्यानं तुम्ही विविध केशरचना करू शकता. काही काळ या क्लिप्स केसांना लावून ठेवा. थोड्या वेळानं काढून टाका. या क्लिप्स केसांना टाईट करतील. मुख्य म्हणजे केस सेट होतील. 
 
* चेहर्‍यावरची अनावश्यक लव घालवण्यासाठी तुमच्या ड्रेसिंग टेबलमध्ये एक चांगला दर्जाचा ट्विझर असायलाच हवा. शार्प, परफेक्ट अलाईड टिप असणारा ट्विझर अगदी सहजतेनं केस प्लक करू शकतो. यावेळी वेदनाही जाणवत नाही. 
 
* बरीचशी सौंदर्यप्रसाधनं पेन्सिल स्वरूपात असतात. ती सुस्थितीत रहावी त्यासाठी शर्पनरची आवश्यकता असते. म्हणूनच तुमच्या ड्रेसिंग टेबलमध्ये वेगवेगळ्या आकाराची शार्पनर असावीत. शक्य असेल तर लीडवाला शार्पनर निवडावा. यामुळे कचरा होणार नाही. 
 
* मेकअप  ब्रश स्वच्छ करणं हे वाटतं तेवढं सोपं काम नव्हे. यासाठी तुमच्याकडे ब्रश क्लिनिंग मॅट असण्याची आवश्यकता आहे. 
 
* केस स्ट्रेट रहावेत अशी इच्छा असणार्‍यांनी एका फ्लॅट आयरनमध्ये गुंतवणूक करायलाच हवी. यात सिरॅमिक प्लेट असते. सिरॅमिक प्लेट तुमच्या केसांना सिल्की लूक देते.
* बॉबी पिन्स ही जुनी अॅक्सेसरी असली तरी अत्यंत उपयुक्त आहे. सुटात असलेला पोनीटेल, बन सावरण्यासाठी बॉबी पिन्सची गरज भासेल. बॉबी पिन्सचा दर्जा उत्तम असायला हवा. निकृष्ट दर्जाच्या पिन्स निवडल्या तर लगेच गंजतील. 
 
* हेअर सेटिंगबरोबरच तुम्हाला डोक्याच्या त्वचेला छानसा मसाज हवा असेल तर ड्रेसिंग टेबलमध्ये कुशन हेअरब्रश ठेवा. हा ब्रश मसाज करण्यासाठी त्याचबरोबर केस स्ट्रेट करण्यासाठी वापरता येतो. 
 
* ड्रेसिंग टेबलमध्ये कॉटन बॉल्स असायला हवेत. मेकअप अथवा नेलपेंट काढण्यासाठी, ज्येवलरी स्वच्‍छ करण्यासाठी, सिरम लावण्यासाठी हे हाताशी लागतील.