1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By वेबदुनिया|

विविधरंगी डिझाईनर क्लच हँडबॅग्ज!

सध्या वैविध्यपूर्ण सुविधांनी युक्त क्लच पॅटर्न हातातील बॅग्जमध्ये पहायला मिळत आहेत. क्लच हँडबॅग्जमध्ये स्त्रियांना आवश्यक असणार्‍या सुविधा, चांगला दर्जा आणि आकर्षक डिझाईन्स उपलब्ध आहेत. या प्रकारे विविध आकारांमध्ये क्लच पर्स उपलब्ध आहेत. कॉम्पॅक्ट पर्स तसेच हँडबॅग म्हणून त्या वापरता येतात. सुंदर दिसण्यासाठी विविध प्रकारचे पोषाख केले जातात. त्यावर शोभून दिसतील अशा वेगवेगळ्या बॅग्ज वापरण्याऐवजी विविध पोषाखांवर शोभून दिसेल अशी एकच क्लच बॅग कामी येऊ शकते.

कॉलेजमध्यी तरुणींपासून नोकरदार महिला आणि गृहिणींच्या पेहरावात शोभा आणण्याकामी क्लच पर्स हा नामी पर्याय ठरतो. जीन्स, सलवार कुर्ता, साडी किंवा अन्य कोणच्याही पेहरावावर क्लच पर्स किंवा हँडबॅग वापरता येते. ‍

आपल्या गरजेनुसार सर्व सोयी असणार्‍या क्लच बॅग्ज खरेदी कराव्यात. त्यामुळे सौंदर्यप्रसाधने तसेच नियमित लागणार्‍या काही वस्तू बरोबर ठेवता येतात. बॅग जड होणे टाळायचे असल्यास एन्व्हलप टाईप क्लच बॅग निवडता येते. अशा प्रकारच्या बॅग्जमध्ये हलक्या रंगांना विशेष पसंती द्यावी. त्यातील त्यात विविधरंगी डिझाईनर क्लच हँडबॅग्जही संग्रही ठेवायला हरकत नाही.