गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Updated : शनिवार, 25 नोव्हेंबर 2023 (18:55 IST)

Denims : हे डेनिम्स प्रत्येकाच्या वॉर्डरोब मध्ये असायलाच हव्यात

denim jeans
डेनिम फॅब्रिक वापरून बनविलेली जीन्स सर्व वयोगटातील लोकांना फार आवडते. हे कपड्यांमधील एक मुख्य फॅशन उत्पादन आहे, कारण कितीही वेळा ती वापरता येते. कोणत्याही प्रकारच्या टॉप, शर्ट, टी-शर्ट च्या खाली जीन्स चांगली शोभून दिसते. चांगल्या दर्जाच्या जीन्सची जास्त काळजी घ्यावी लागत नाही, तसेच ती दीर्घकाळ हि टिकते. ग्राहकांचा आणि चालू ट्रेंडचा अंदाज घेऊन, स्पायकरची GYM JNS नामक नवीन डेनिम जिम, कॉलेज, ऑफिस, डेटसाठी किंवा नाईट पार्टीसाठी वापरण्यास खूप उपयोगी आहे. या डेनिमचे अनेक वैशिष्ठये आहेत, साधारण डेनिम २ बाजूने स्ट्रेच होते तर हि डेनिम ४ बाजूने स्ट्रेच होते, लवकर वाळण्यास ही मदत होते. त्यामुळे स्पायकरच्या GYM JNS चा तरुण आणि तरुणींमध्ये ट्रेंड वाढताना दिसत आहे. क्लासिक ब्लू इंडिगो जीन्स ऑफिससाठी देखील वापरली जाऊ शकते. निळा आणि इंडिगो रंगाच्या जीन्स कॅज्युअल आणि फॉर्मल म्हणून हि सहज वापरता येतात.
 
तर आज जाणून घेऊया काही महत्वाच्या डेनिम्स बद्दल, ज्या तुमच्या वॉर्डरोब मध्ये असायलाच हव्यात.
 
रॉ वॉश्ड जीन्स - गडद रंगाची शेड असलेली जीन्स सेमी फॉर्मल कार्यक्रमांसाठी शोभून दिसते आणि मित्रांसोबत फिरण्यासाठी सुद्धा चांगला पर्याय आहे. लाईट ब्लु आणि मध्यम निळ्या रंगातील जीन्स  संपूर्ण दिवसभर वापरली जाऊ शकते.
 
पाच खिसे असलेली जीन्स - पाच खिसे असलेली जीन्स एक सदाहरित जीन्स आहे, जी कधीही फॅशन मधून बाहेर जात नाही. क्लासिक इंडिगो जीन्स किंवा चांगल्या दर्जाचे डेनिम फॅब्रिकपासून बनविलेल्या कोणत्याही कपड्याची केलेली निवड चुकत नाही. हि डेनिम कोणाच्याही वॊर्डरोब मधून कधीही गायब न होणारी गोष्ट आहे.
 
स्पायकर GYM JNS : यामध्ये डेनिम मध्ये कूलोट्स, जिम जीन्स, मॉम जीन्स असे प्रकार आहेत. यामध्ये वापरलेले फॅब्रिक वजनाने हलके तरीही मजबूत असल्याने जिम मध्ये तर वापरता येतेच, शिवाय उन्हाळ्यात हि ती आरामदायी वाटते. कॉन्सर्ट साठी उत्तम पर्याय आहे. डेनिम शॉर्ट तुम्हाला स्मार्ट लुक देईल, त्याच सोबत जिम जीन्स वर डेनिम जॅकेट घालून तुम्ही स्टायलिश दिसू शकता.
 
डेनिम लुक - डेनिम ट्रकर, शर्ट आणि जीन्स किंवा जॉगर्स सारखे कपडे मजबूत, तसेच त्यांना जास्त जपावी लागत नसल्याने संध्याकाळी पार्टीला जाताना, वीकेंडला मित्रांसह फिरताना अधिक ह्या कपड्यांचा अधिक चांगला उपयोग होतो. डेनिम मध्ये उच्च दर्जाचे कॉटन असल्याने उन्हाळ्यात कुठेही फिरताना आरामदायक वाटते.
 
इंडिगो डाईड जीन्स - मिड वॉश्ड इंडिगो डाईड जीन्सची क्लासिक जोडी प्रत्येकाच्या वॉर्डरोब मध्ये असणे आवश्यक आहे. ओकेजन ला ड्रेस कोड नसल्यास जीन्स तिथे खूप उपयोगी येते. संध्याकाळी इव्हेंटसाठी जात असल्यास गडद निळ्या किंवा काळ्या रंगाची गडद जीन्स परफेक्ट शोभून दिसेल. जर गडद रंगाचे शर्ट किंवा टॉप घालत असाल तर, त्या खाली त्याच रंगातील फिक्या रंगाची जीन्स परिधान करा.