रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई सल्ला
Written By

Job Feng Shui Tips चांगली नोकरी मिळविण्यासाठी खास

Feng Shui Tips for Job वास्तु आणि फेंगशुई याने जीवनात प्रगती आणि सुख मिळविण्यासाठी उपाय केले जाऊ शकतात. घरात दिशानुसार काही वस्तू ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा येते आणि काही उपाय केल्याने मनाप्रमाणे नोकरी, सुख-समृद्धि आणि यश प्राप्ती होते.
 
घराच्या उत्तरी दिशेकडे संसारिक चित्र लावल्याने जीवनात स्पष्टता येते. कोणासमोर ही आपली गोष्ट मांडणे सोपं होतं.
 
शयनकक्षाच्या उत्तरी दिशेत त्या व्यवसायसंबंधी लोकांचे फोटो लावावे ज्यांचे व्यक्तिमत्त्वाचा तुमच्यावर परिणाम होतो ज्या लोकांशी आपण प्रभावित आहात. या दिशेत जीवनात ऊर्जेचा प्रवाह होतो. जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी सकारात्मक आणि यशस्वी लोकांचे फोटो लावा.
 
जीवनात प्रगतीसाठी आणि लक्ष्य प्राप्तीसाठी घराच्या उत्तर-पश्चिमी दिशेत सकारात्मक आणि प्रगत लोकांचे फोटो लावा.
 
फेंगशुईप्रमाणे मनाप्रमाणे नोकरी मिळविण्यासाठी शयनकक्षातील उत्तर-पश्चिम दिशेत कोणत्याही प्रकाराची धातुने निर्मित सजावटी वस्तु किंवा फोटो लावा.
 
जीवनात नवीन संधी मिळत राहावी म्हणून घराच्या उत्तर दिशेकडे जल व्यवस्था, पाण्याची सजावटी वस्तु किंवा फोटो लावा.
 
घराच्या दक्षिण-पूर्व दिशेचा संबंध धनाशी असल्यामुळे ही जागा स्वच्छ असावी. या जागेवर सुवासिक उदबत्ती लावावी. असे केल्याने घरात पैशांचे आवक होते.