1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 18 जानेवारी 2021 (15:43 IST)

फेंगशुई पिरामिड ठेवल्याने अभ्यासात एकाग्रता वाढते

feng shui tips
चीनी वास्तु अर्थात फेंगशुई यात पिरामिड घरात ठेवण्याचे खूप महत्त्व आहे. पिरामिड घरात ठेवून वास्तु दोष दूर करता येतात. जाणून घ्या पिरामिडशी निगडित काही उपाय-
 
जर मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल तर आपल्याला पिरामिड ठेवलं पाहिजे. याने एकाग्रता वाढते.
शत्रू बाधा असल्यास घरात दक्षिण दिशेला पिरामिड ठेवावे.
यश-कीर्ति प्राप्त करण्यासाठी घराच्या पूर्व दिशेला पिरामिड ठेवावे.
कुटुंबात एखाद्या वाईट संगत असेल तर पिरामिड ठेवणे फायदेशीर ठरेल.
पचन शक्ती कमकुवत असल्यास पाणी पिण्यापूर्वी त्या पिरामिडवर ठेवल्याने पचन शक्ती सुधारते.