सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By

Anant Vrat 2022 Puja Vidhi अनंत चतुर्दशी मुहूर्त व्रत विधि

अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत रूपाची आराधना केली जाते. या दिवशी 14 गाठी बांधून एक अनंत धागा बनवला तयार केला जातो. ज्याची पूजा केल्यानंतर तो हातावर बांधला जातो. मान्यतेनुसार देवाने भौतिक जगामध्ये 14 लोक बनवले होते. ज्यामध्ये भूलोक, भुवर्लोक, स्वर्लोक, महर्लोक, जनलोक, तपोलोक, ब्रम्हलोक, अतल, वितल, सतल, रसातल, तलातल, महातल आणि पाताल यांचा समावेश होतो. मान्यतेनुसार अनंतसूत्रामध्ये 14 गाठी 14 लोकांचं प्रतीक म्हणून बांधल्या जातात. तर असे देखील म्हणतात की मानवी देहात 14 प्रमुख ग्रंथी असतात. या ग्रंथींचे प्रतीक म्हणून दोर्‍याला 14 गाठी असतात. जो 14 वर्षांपर्यंत सतत अनंत चतुर्दशीचं व्रत करतो, त्याला विष्णू लोकाची प्राप्ती होते, असा देखील विश्वास आहे. पुरूषांच्या उजव्या तर महिलांच्या डाव्या हातात अनंत सूत्र बांधले जाते.

अनंत चतुर्दशी शुभ मुहूर्त
वैदिक पंचांगानुसार चतुर्दशी तिथी यंदा 8 सप्टेंबर रोजी सकाळी 9.02 पासून आरंभ होईल आणि 9 सप्टेंबर 2022 रोजी संध्याकाळी 6:07 वाजता संपेल. 
शुभ मुहूर्त 9 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 06.24 वाजेपासून ते संध्याकाळी 06:08 पर्यंत राहील. या दरम्यान आपण पूजा करु शकता. तसेच या वर्षी अनंत चतुर्दशीला रवि योग आणि सुकर्मा योग बनत आहे. पंचांगानुसार या दिवशी रवि योग सकाळी 06 वाजून 02 मिनिटापासून सुरु होईल आणि सकाळी 11 वाजून 34 मिनिटापर्यंत राहील. तर सुकर्मा योग सकाळपासून सुरु होईल आणि संध्याकाळी 06 वाजून 11 मिनिटापर्यंत राहील.
 
अनंत चतुर्दशी पूजा विधी
अनंत चतुर्दशीच्या दिवशी व्रत करणाऱ्यांनी सकाळी स्नान आणि इतर नित्यकर्म करून निराहार राहून कलशाची स्थापना करावी.
कलशावर अष्टदल कमळाच्या बनवलेल्या भांड्यात कुशपासून बनवलेल्या अनंताची स्थापना करावी.
त्यासमोर कुंकू, केसर किंवा हळद वापरून कच्च्या धाग्याचा चौदा गाठींचा अनंत धागा ठेवावा. 
कुशच्या अनंततेची पूजा करावी, त्यात भगवान विष्णूचे आवाहन आणि ध्यान करावे.
सुगंध, अक्षत, फुले, धूप, दिवा, नैवेद्य इत्यादींनी पूजा करावी. 
यानंतर अनंत देवाची कथा ऐकावी. 
विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.
पूजेच्या शेवटी एका भांड्यात दूध, सुपारी आणि अनंत धागा टाकून क्षीर मंथन करावं. 
अनंत पूजनात भोपळ्याचे घारगे आणि वडे यांचा नैवेद्य दाखवावा.
आरती करावी आणि अनंत देवाचं ध्यान करून अनंत सूत्र पुरूषांच्या उजव्या आणि स्त्रीयांच्या डाव्या हातात बांधावे.
या दिवशी, नवीन धाग्याचे अनंत परिधान करून, जुन्याचा त्याग केला पाहिजे.
ब्राह्मणाला दान देऊन हे व्रत संपवले पाहिजे.
 
अनंत सूत्र बांधण्याचा मंत्र- 
अनंत संसार महासमुद्रे
मग्नं समभ्युद्धर वासुदेव।
अनंतरूपे विनियोजयस्व
ह्यनंतसूत्राय नमो नमस्ते।।
 
यानंतर ब्राम्हणांना जेवू घालावं आणि स्वतः प्रसाद ग्रहण करावा.

श्री अनंताची आरती Arati Anantachi
जय श्री अनंता लक्ष्मीकांता आरती ओवाळू ।
भक्तां संकट पडतां धावे अनंत कनवाळू ।। धृ।।
 
भाद्रपद मासी शुक्ल चतुर्दशी तव व्रत नेमाने ।
दुकूलदोरक करुनि पूजिती अनंत नामानें ।।1।।
 
नानापरिची पुष्पें द्रव्ये तुजला अर्पीती ।
षोडशपूजा करूनि ब्राह्मण संतर्पण करिती ।।2।।
 
अपूप वायन दंपतिपूजन त्या दिवशी करिती ।
अनंत संतुष्टोनि देती संतति संपत्ती ।।3।।
 
रामा धर्मा आचरिता व्रत क्लेशांतुनि सुटला ।
कौंडिण्याने पुजिता तुजला उद्धरिले त्याला ।।4।।
 
मोरेश्वरसुत वासुदेव हा तिष्ठत सेवेसी ।
संकटकाळी रक्षी अनंता अपुल्या दासासी ।।5।।