बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By

या पाच कारणामुळे शरद पौर्णिमेला महत्त्व

हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीचं अत्यंत महत्त्व असतं. प्रत्येक महिन्यात येणारी पौर्णिमा विशेष असते. आश्विनी पौर्णिमा देखील त्यापैकी एक आहे. शरद ऋतूतील आश्विन महिन्यातील आश्विनी पौर्णिमेला शरद पौर्णिमा देखील म्हणतात. जाणून घ्या काय विशेष आहे या पौर्णिमेत.
 
तसं तर प्रत्येक पौर्णिमेला चंद्र बघण्यासारखं असतं परंतू आश्विन महिन्यातील पौर्णिमेची रात्र चंद्राच्या प्रकाशाने उजळलेली असते. शरद पौर्णिमेच्या रात्री जागरण, भजन केल्याने आणि चंद्र प्रकाशात ठेवलेल्याने खीर किंवा दुधाच्या नैवेद्य दाखवून सेवन करण्याचे विशेष महत्त्व आहे.
 
शरद पौर्णिमा दरम्यान चातुर्मास असल्यामुळे भगवान विष्णू निद्रा अवस्थेत असतात. चातुर्मासाचा हा चरण शेवटला असतो. तसेच शरद पौर्णिमा असे संबोधन केल्यामागील कारण या दिवसात सकाळ आणि संध्याकाळ दरम्यान गारवा जाणवतो.
 
शरद पौर्णिमा दरम्यान चंद्र आपल्या 16 कलांनी पूर्ण असून रात्रभर आपल्या प्रकाशाने अमृत वर्षा करत असतो. म्हणून यात ठेवलेलं दूध अमृत समान असतं. अमृत, मनदा (विचार), पुष्प (सौंदर्य), पुष्टी (स्वस्थता), तुष्टी (इच्छापूर्ती), धृती (विद्या), शाशनी (तेज), चंद्रिका (शांती), कांती (कीर्ती), ज्योत्स्ना (प्रकाश), श्री (धन), प्रीती (प्रेम), अंगदा (स्थायित्व), पूर्ण (पूर्णता अर्थात कर्मशीलता) पूर्णामृत (सुख) अश्या चंद्राच्या प्रकाशाच्या 16 अवस्था आहेत. मनुष्याच्या मनात देखील एक प्रकाश आहे आणि मन हे चंद्र आहे. चंद्राच्या घट-बढ प्रमाणेच मनाची स्थिती असते.
 
या व्यतिरिक्त शरद पौर्णिमेला कृष्णाने गोप्यांसह महारास केल्याचे देखील उल्लेख आहे. यामुळे या रात्रीला रास पौर्णिमा देखील म्हटलं जातं.
 
या दिवशी साक्षात लक्ष्मी देवी येऊन चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते अशी धारणा आहे. या मध्यरात्री 'को जागर्ति' म्हणजे 'कोण जागत आहे' असे म्हणत लक्ष्मी देवी पृथ्वीतलावर संचार करीत असते आणि भक्तांच्या आराधनेला प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. उपवास, पूजन व जागरण याचे या व्रतात महत्त्व आहे. कोजागरीच्या रात्री मंदिरे, घरे, रस्ते, उद्याने इ. ठिकाणी दिवे लावतात.