सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By वेबदुनिया|

ओणम साजरा करण्याची पारंपारिक पद्धती

केरळातील ओनम्‌ सणाचे सालंकृत भोजन
ओणमच्या निमित्ताने केरळचे पारंपारिक नृत्य कथकली आणि पुलीकली किंवा काडुवकलीचे आयोजन ठिकठिकाणी केले जाते. ओनसद्या या पक्वान्नाशिवाय ओणमची सांगता होत नाही. तसेच तांदूळ आणि तांदळाचे विविध पदार्थ, डाळीची आमटी, पापड आणि तूप असा जेवणाचा बेत असतो. सांबार, [ओलण], रसम, थोरन, अवियल, पचडी, विविध प्रकारची लोणची आणि मोरू (ताक) यांनाही फार महत्त्व आहे.

केरळातील सर्पाकारबोटींची स्पर्धा
ओणमच्या वेळी पारंपारिक सर्प नौका स्पर्धांचे आयोजन दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी केले जाते. या स्पर्धेच्या खास नौका फणसाच्या लाकडाच्याच बनविलेल्या असतात. त्या खूप लांब आणि निमुळत्या असतात, एकेका नौकेत शंभरावर लोकही असतात. त्यात नौका वल्हविणाऱ्यांसह मोठ्या आवाजात साद घालून उत्साह वाढविणारेही असतात.