रविवार, 26 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By

वटपौर्णिमा: आरोग्यासाठी वटाची पूजा

अनेक सण आणि परंपरांनी समृद्ध आपल्या संस्कृती प्रत्येक सण साजरा करण्यामागील धार्मिक पेक्षा शास्त्रीय कारण किंवा काही विशेष उद्देश्य असत असे म्हणणे देखील योग्य ठरेल. बघायला गेलं तर प्रत्येक सण आणि त्यात दाखवण्यात येणारे नैवेद्य देखील त्या ऋतूप्रमाणे आरोग्यासाठी लाभदायक ठरणारे असतात. तसेच अनेक सण स्त्रियांनी घराबाहेर पडून काही काळ आपल्या मैत्रीणींसबोत घालवावा हा देखील उद्देश्य असावा. कारण पूर्वी स्त्रिया केवळ कामानिमित्तच बाहेर पडत होत्या. या सर्व कारणांमुळेच प्रत्येक सणाला धार्मिक पांघरून घातले असावे ज्याने करून निसर्गाशी जुळण्याची संधी मिळत राहावी.
 
अशा व्रतांपैकी एक व्रत वटपौर्णिमेचं. याचे शास्त्रीय कारण जाणून आपल्याला देखील या व्रताचे महत्त्व पटेल. 
 
वडाचे झाड 24 तास ऑक्सिजन प्रदान करतं. त्यामुळे वडाजवळ जाऊन काही काळ घालवणे म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहणे. त्याने ताजी हवा मिळते आणि ताजेतवानं झाल्यासारखं जाणवतं.
 
वडाची मुळे, पाने, फुले, फळे, साल, पारंब्या, चीक ह्या सगळ्यांचा औषधी उपयोग होतो व त्यामधून असंख्य आजारांवर उपचार करता येतो.
 
वीर्य वाढवण्यासाठी वडापासून रामबाण औषध मिळते व स्त्रीच्या गर्भाशयाच्या आरोग्यासाठी वडाच्या झाडाच्या सालीचा खूप उपयोग होतो. तसेच योनिमार्गातील इन्फेक्शन दूर करण्यासाठी वडाच्या झाडाच्या सालीचा उपयोग होतो.
 
वटपौर्णिमा ही पावसाळ्यात येते आणि या काळात आजारांचे प्रमाण वाढते. म्हणून आजारापासून दूर राहण्यासाठी मनाशी आरोग्यदायी संकल्प करणं आवश्यक असतं. हा संकल्प वटपौर्णिमेच्या पूजेतून काहीसा साध्य करता येतो.
 
वृक्षाच्‍या सालीचा काढा मधुमेहावर गुणकारी आहे.
 
या वृक्षाची पाने तोडल्यावर निघाणार्‍या चिकने विंचवाचे विष कमी होण्यास मदत मिळते. 
 
चीक पायाच्या भेगा, चिखल्या बर्‍या होण्यासाठी देखील उपयोगी आहे.
 
वडाची पाने तेल लावून थोडी गरम करून दुखत असलेल्या भागावर बांधल्यास सांधे मोकळे होतात. 
 
ताप कमी होण्यास ह्याचा पारंब्यांचा रस देतात. 
 
वडाच्या पारंब्या या केसवाढीसाठी उपयुक्त असतात. 
 
वडाच्या झाडाला अनेक फांद्या असून त्याची मूळ खोलवर जातात. अनेक फांद्यांना सांभाळत, मातीशी घट्ट नातं जोडून ते झाड वर्षानुवर्षे टिकून राहतं. 
 
निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवल्यास त्यातून तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल. त्यामुळे घरात फांदी आणून पूजा करण्याऐवजी वडाच्या झाडाजवळ जाऊन चारचौघांत वेळ घालवून जो आनंद जाणवतो तो घरातील चार भिंतीत मिळणे शक्य नाही.