शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

स्वर्गात स्थान मिळवण्यासाठी जाणून घ्या वरूथिनी एकादशीचे महत्त्व

चैत्र मासातील कृष्ण पक्ष एकादशीला वरूथिनी एकादशी या नावाने देखील ओळखले जाते. वर्ष 2019 मध्ये ही एकादशी 30 एप्रिल, मंगळवारी येत आहे. 
 
या एकादशी संबंधात एका पौराणिक ग्रंथानुसार एकदा धर्मरा‍ज युधिष्ठिर म्हणाले की प्रभू! चैत्र मासातील कृष्ण पक्षाच्या एकादशीचे नाव काय आहे, त्याची विधी काय आणि एकादशी केल्याचे फळ काय. हे मला विस्तारपूर्वक सांगावे.
 
श्रीकृष्ण म्हणाले की हे राजेश्वर! या एकादशीचे नाव वरूथिनी आहे. ही सौभाग्य प्रदान करणारी, सर्व पाप नष्ट करणारी आणि शेवटी मोक्ष प्रदान करणारी आहे. हे व्रत केल्याने सौभाग्य प्राप्ती होते आणि या वरूथिनी एकादशीच्या पराभवामुळेच राजा मान्धाता स्वर्गात पोहचले होते.
 
वरूथिनी एकादशीचे फळ दहा हजार वर्षापर्यंत तप करण्यासमान आहे. कुरुक्षेत्रात सूर्यग्रहणावेळी एक मन स्वर्णदान केल्याचे जे फळ असतं ते फळ वरूथिनी एकादशी व्रत केल्याने प्राप्त होतं. वरूथिनी एकादशी व्रत केल्याने मनुष्य या लोकात सुख भोगून परलोकात स्वर्गाची प्राप्ती करू शकतो.
 
शास्त्रांमध्ये म्हटले आहे की हत्ती दान अश्व दानाहून देखील श्रेष्ठ आहे. हत्ती दानापेक्षा भूमी दान, भूमी दानापेक्षा तीळ दान, तीळ दानापेक्षा स्वर्ण दान आणि स्वर्ण दानापेक्षा अन्न दान श्रेष्ठ आहे. अन्न दानासारखे कुठलेही दान नाही. अन्न दानामुळे देवता, पितर आणि मनुष्य तिन्ही तृप्त होतात. शास्त्रांमध्ये याला कन्या दान समान मानले गेले आहे.
 
वरूथिनी एकादशी व्रताने अन्न दान आणि कन्या दान दोन्हीच्या बरोबरीचे फळ प्राप्त होतं. जे मनुष्य लोभाच्या वशमध्ये येऊन कन्येचं धन घेतात त्यांना प्रलय काळापर्यंत नरकात वास करावा लागतो किंवा पुढील जन्मात मांजरीचा जन्म भोगावा लागतो. जी व्यक्ती प्रेम आणि धनासकट कन्येचा दान करतात त्यांचे पुण्य चित्रगुप्त देखील लिहिण्यात असमर्थ आहे. इतकं कन्या दानाला महत्त्व देण्यात आले आहे.
 
हे राजन्! जी व्यक्ती विधिवत एकादशी व्रत करतात त्यांना स्वर्गलोक प्राप्ती होते. म्हणून मनुष्याला पाप कर्म करण्याची भीती असावी. या एकादशीचे व्रत गंगा स्नानच्या फळापासून देखील अधिक आहे. या व्रताचे महत्मय वाचल्याने एक हजार गोदान फळ प्राप्त होतं. म्हणून प्रत्येक मनुष्याला एकादशीला नियमपूर्वक धर्म आचरणात वेळ घालवला पाहिजे.