शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By

नारद जयंती विशेष : ब्रम्हदेवाच्या सात मानस मुलांपैकी एक देवऋषी नारद

वैशाख कृष्ण प्रतिपदा देवऋषी नारदाचं अवतरण दिन नारद जयंती म्हणून साजरा केला जातो. यंदाचा वर्षी नारद जयंती पंचांग मध्ये भेद असल्याने 8 मे रोजी साजरी केली जाणार आहे. शास्त्रानुसार देवऋषी नारद परमपिता ब्रह्माच्या सात मानलेल्या मुलांपैकी एक असे. कठोर तपश्चर्या करून ह्यांनी ब्रह्मश्री चे पद मिळवलं. विष्णूंचे हे परम भक्त असे. 
 
शास्त्रांमध्ये ह्यांना देवांचे मन असल्याचे भूषविले आहे. देवच नव्हे तर राक्षस सुद्धा यांना आदर देत असे. सर्व देव आणि दानव ह्यांच्या कडून सल्ला घेत असे. स्वतः भगवान विष्णूंनी श्रीमद्भगवतगीतेच्या 10व्या अध्यायाच्या 26 व्या ओळींमध्ये यांची महत्ता सांगितली आहे. ते म्हणतात- ''देवर्षीणाम च नारद: देवर्षींमध्ये मीच नारद असे. 
 
सृष्टीचे प्रथम संदेश वाहक 
अशी आख्यायिका आहे की नारद मुनींचा अवतरण परमपिता ब्रह्माच्या मांडीपासून झाले असे. अशी आख्यायिका आहे की नारद तिन्ही लोकांमध्ये फिरत असायचे. त्यांच्या फिरण्यामागील उद्देश भक्तांच्या दुःखाला देवा पर्यंत पोहोचविण्याचे असे. ते भगवान विष्णूंचे भक्त असे. नार शब्दाचे अर्थ आहे पाणी. हे सगळ्यांना ज्ञानाच्या दान तरपण देण्यात मदतीसाठी नारद म्हटले गेले. हे सुष्टीचे पहिले संदेश वाहक असल्याचे काम करत असे. हे एकाचे निरोप दुसऱ्याला देण्याचे काम करीत असे. अशी आख्यायिका आहे की आपणास भगवान विष्णूंना प्रसन्न करण्याआधी देवर्षी नारद याना प्रसन्न करणे गरजेचे आहे. 
 
पूजा कशी करावी -
भाविक या दिवशी उपास करतात. पवित्र धार्मिक ग्रंथाचे पठण केलं जातं. या दिवशी रात्रीला जागरण केलं जातं. विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी मंत्र जप करतात. सायंकाळी पूजा केली जाते. विष्णुसहस्त्रनाम या ग्रंथाचे पठण केलं जातं आणि पूजेची सांगता झाल्यास भगवान विष्णूंची आरती करावयाची असते.