नृसिंह जयंतीला या 7 वस्तू देवाला अर्पित करा, सर्व अडचणी दूर होतील
Shri Narasimha Jayanti 2024: 22 मे 2024 रोजी वैशाख शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला भगवान नृसिंह जयंती आहे. या दिवशी श्रीहरि विष्णुजींच्या अवतार नृसिंहदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांची कृपा प्राप्तीसाठी 7 थंड आणि रसाळ पदार्थांचे नैवेद्य दाखवावे.
नृसिंह जयंती उपाय (Shri Narasimha Jayanti): या दिवशी घरी किंवा मंदिरात भगवान नरसिंहाची पूजा करण्याची परंपरा आहे. देवाची पूजा फुल आणि चंदनाने करावी. यानंतर तुमची जी इच्छा असेल ती वस्तू देवाला अर्पण करा.
1. धनासाठी किंवा बचत व्हावी यासाठी नृसिंहाला नागकेसर अर्पित केले जाते. नागकेसर अर्पित करुन जरा घरी आणावे आणि घराच्या तिजोरी किंवा संपत्ती ठेवत असलेल्या ठिकाणी ठेवावे.
2. कुंडलीत कालसर्प दोष असल्यास नृसिंह जयंतीला नृसिंह मंदिरात जाऊन एक मोरपीस ठेवून द्या.
3. जर तुम्ही कोणत्याही कायदेशीर पेचप्रसंगात अडकले असाल आणि कोर्टात फेऱ्या मारून थकले असाल तर नृसिंह चतुर्दशीला देवाला दही अर्पण करा.
4. जर तुम्ही स्पर्धेमुळे त्रस्त असाल किंवा अज्ञात शत्रूंची भीती नेहमी वाटत असेल तर भगवान नरसिंहाला बर्फ मिसळलेले पाणी अर्पण करा. तुम्हाला सर्व बाजूंनी यश मिळू लागेल.
5. जर कोणी तुमच्यावर रागावला असेल किंवा तुमच्यापासून दूर गेला असेल तर त्याच्यासोबतचे नाते पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी मंदिरात मक्याचे पीठ दान करा.
6. जर तुम्ही कर्जात बुडत असाल किंवा तुमचा पैसा बाजारात अडकला असेल आणि कर्ज वसूल होत नसेल तर भगवान नृसिंहला चांदी किंवा मोती अर्पण करा.
7. शरीरात दीर्घकाळ कोणताही आजार असल्यास आणि आराम मिळत नसेल तर भगवान नृसिंहला चंदनाची पेस्ट अर्पण करा.