1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By
Last Updated : गुरूवार, 8 फेब्रुवारी 2024 (17:18 IST)

वसंत पंचमी 2024 : वसंत पंचमीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये?

vasant panchami
हिंदू धर्मात सर्व देवदेवतांसाठी सण समर्पित आहे तसेच वसंत पंचमीचे पर्व माता सरस्वतीला समर्पित आहे. या दिवसापासून वसंत पंचमीची सुरुवात होते आणि हे पर्व महत्वपूर्ण मानले जाते. या दिवशी विद्यार्थी, कलाकार, साहित्यकार, पत्रकार माता सरस्वतीची पूजा विशेष रुपाने करतात. या दिवशी सर्व लोक गुरूंचा आशीर्वाद घेतात. लहान मुलांना शिक्षणाचे ज्ञान देण्यासाठी वसंत पंचमीचा दिवस शुभ मानला जातो. 
 
वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची पूजा विशेष रुपाने करा. या दिवशी खास करून विद्यार्थी वर्गाने यश प्राप्तीसाठी माता सरस्वतीची पूजा आणि प्रार्थना करावी. या दिवशी माता सरस्वतीसाठी केशरचा हलवा करून नैवेद्य दाखवावा. नंतर सर्वांना प्रसाद वाटावा. या दिवशी पुस्तकांची साफसफाई  करावी माता सरस्वतीसाठी भजन करावे. माता सरस्वतीला पिवळे वस्त्र चढवावे. आणि या दिवशी शक्य झाल्यास पिवळे वस्त्र परिधान करून पूजा करावी. वसंत पंचमीच्या दिवशी घरातील लहान मुलांना ब्रम्हमुहुर्तावर उठवून त्यांच्या कडून विधिवत माता सरस्वतीची पूजा करून घेणे. 
 
वसंत पंचमीच्या दिवशी या गोष्टी करू नये. वसंत पंचमीच्या दिवशी रागराग करू नये चिडचिड केल्यास माता सरस्वतीच्या पूजेचे पुण्य मिळत नाही. वसंत पंचमीच्या दिवशी मांस, धूम्रपान करू नये. या दिवशी खोटे बोलू नये वसंत पंचमीच्या दिवशी कांदा, लसूण सेवन करणे टाळावे. 
 
वसंत पंचमीच्या दिवशी या मंत्राचा जप करणे. 
ॐ श्री सरस्वती शुक्लवर्णां सस्मितां सुमनोहराम्।। कोटिचंद्रप्रभामुष्टपुष्टश्रीयुक्तविग्रहाम्।
या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
ॐ ऐं वाग्देव्यै च विद्महे कामराजाय धीमहि सरस्वत्यै नमो नित्यं भद्रकाल्यै नमो नमः। 
वेद वेदांत वेदांग विद्यास्तानेत्र्य एव च। सरस्वती महाभागे विद्ये कमललोचने,
विद्यारूपे विशालाक्षी विद्यां देहि नमोस्तुते। 
" ओम ऐं ह्रीं क्लीं महासरस्वती देव्यै नमः " 

Edited By- Dhanashri Naik