वटपौर्णिमा पूजा विधी (पूजेसाठी लागणारे साहित्य)

vat savitri purnima
Last Modified मंगळवार, 22 जून 2021 (09:06 IST)
ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाचे ओळखली जाते. सुवासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात. तर चला जाणून घ्या पूजेसाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी.

वटपौर्णिमा पूजेसाठी लागणारे साहित्य
सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती
धूप- दीप-उदबत्ती
तूप
पाच प्रकारची फळं (सफरचंद, केळी, संत्री, मोसंबी, चिकू)
फुले
दिवा
वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा
पाणी भरलेला लहान कलश
हळद - कुंकू
पंचामृत (तूप, दही, दूध, मध आणि साखर यांचे मिश्रण एका वाटीत घालून एकत्र करणे)
हिरव्या बांगड्या
शेंदूर
एक गळसरी (काळी पोत)
अत्तर
कापूर
पूजेचे वस्त्र
विड्याचे पाने
सुपारी
पैसे
गूळ खोबऱ्याचा नैवेद्य
आंबे
दूर्वा
गहू


पूजा विधी पूजा विधी
पर्यावरणाच्या दृष्टीने वडाला खूपच महत्त्व आहे. वडाचे झाडे हे आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी लाभदायी ठरते. वडाच्या झाडेचे अनेक फायदे आहेत. या दिवशी प्रत्यक्ष वडाची पूजा करतात.

ज्येष्ठ पौर्णिमेला सुवासिनी महिला हे व्रत करतात. हे तीन दिवसाचे व्रत आहे. व्रतारंभ हा पौर्णिमेच्या आधी दोन दिवस करण्यात येतो. तरी शक्य नसल्यास केवळ पोर्णिमेला व्रत करुन पूजा करावी. दिवसभर उपवास करून यादिवशी रात्री हा उपवास सोडावा. हे तिन्ही दिवस अगदी षोडशोपचार पद्धतीने वडाची पूजा करावी. पण रोज शक्य नसल्यास, घरी पूजा, जप, नामस्मरण करण्यात यावे. तिसऱ्या दिवशी अर्थात वटपौर्णिमेला नित्यकर्म, आंघोळ आणि देवाची प्रार्थना, तुळशी पूजन करून वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करावी.
सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सुवासिनींनी सौभाग्यलंकार परिधान करावे.
सौभाग्यवती स्त्रीने ‘मला आणि माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो’, असा संकल्प करावा.
वडाखाली चौरंग मांडून ही पूजा करावी.
प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी.
गणपतीची हळद कुंकू अक्षता वाहून पंचोपचार पूजा करावी.
नंतर सती मातेच्या मूर्ती किंवा मूर्ती उपलब्ध नसल्यास इतर अजून एक सुपारीची पण पंचोपचार पूजा करावी.
हळदी-कुंकू, काली पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार अर्पण करावे.
वडाला हळद कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा.
धागा बांधून सात फेऱ्या मारून प्रार्थना करावी.
हे मंत्र म्हणावे-
” सावित्री ब्रम्हा वादिनी सर्वदा प्रिय भाषिणी।
तेन सत्येनमां पाहि दुःखसंसार सागरात।।
अवियोगि यथा देव सवित्र्या सहीतस्य ते।
अवियोग तथास्माकं भूयात् जन्म जन्मनि।।”
वडाच्या झाडाला फेऱ्या मारणे शक्य नसल्यास, घरच्या घरी चौरंग मांडून पूजा करावी.
देवांचे स्मरण करून चौरंगावर मांडलेल्या देवांना हळद कुंकू वाहून फुलं वाहावी.
नंतर पंचामृताचं नेवैद्य दाखवावं.
धूप, दीप आणि अगरबत्ती दाखवावी.
व्रताचा संकल्प सोडून प्रार्थना करावी.
5 सुवासिनींची आंबे व गव्हाने ओटी भरावी.
भक्तीभावाने नमस्कार करून शिऱ्याचा अथवा फुटाण्याचा प्रसाद सर्वांना वाटावा.
नंतर सावित्री आणि सत्यवानाच्या नावाचा जप करावा.
सायंकाळी सुवासिनींसह सावित्रीच्या कथेचे वाचन करावे.

व्रत करणार्‍यांनी दिवसभर उपवास करून फळांचे सेवन करावे. काही जण हा उपवास त्यात दिवशी रात्री मुहूर्ताप्रमाणे सोडतात. पण बऱ्याच महिला या दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा नित्यकर्म आटोपून आंघोळ करून देवाची पूजा करतात. देवाला दही आणि भाताचा नेवैद्य दाखवूनही हा उपवास सोडला जातो.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

Somvati Amavasya 2022: सोमवती अमावस्येला या गोष्टी करणे ...

Somvati Amavasya 2022: सोमवती अमावस्येला या गोष्टी करणे टाळा, जाणून घ्या व्रताचे महत्त्व
हिंदू धर्मात दर महिन्याला येणाऱ्या अमावस्येचे महत्त्व असते. असे म्हटले जाते की प्रत्येक ...

श्री कुञ्जिका स्तोत्रम् Shri Kunjika Stotram

श्री कुञ्जिका स्तोत्रम् Shri Kunjika Stotram
श्री कुञ्जिका स्तोत्रम् सिद्ध कुंजिका स्तोत्र ऊँ श्रीकुञ्जिकास्तोत्रसिद्ध कुंजिका ...

Nautapa 2022 नवतपा दरम्यान पाणी पाजल्याने पुण्य लागतं, ...

Nautapa 2022 नवतपा दरम्यान पाणी पाजल्याने पुण्य लागतं, गरजूंना अन्नदान केल्याने समस्या दूर होतात
नवतपामध्ये सूर्याची किरणे पृथ्वीवर दीर्घकाळ असतात. ज्यामुळे उष्णता आणखी वाढेल. यामुळे ...

आर्यादुर्गा देवी - श्रीआर्यादुर्गाष्टक

आर्यादुर्गा देवी - श्रीआर्यादुर्गाष्टक
आर्यादुर्गे देवी । निज भक्तां शांति सुख सदा देई ॥ इह पर शत्रू शमवुनि । निज सुख दे पाप ...

आर्यादुर्गा देवी - अध्याय ४

आर्यादुर्गा देवी - अध्याय ४
सर्व राक्षसांचा संहार करुन । आर्यादुर्गा देवी गुप्त होऊन । हें दृश्य सर्वांनी पाहून । ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...