1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. नाट्य-चित्र-समीक्षा
Written By वेबदुनिया|

पुणे व्हाया बिहार : चित्रपट परीक्षण

प्रेम या भावनेला कशाचीच बंधने नसतात.

ना जाती-धर्माची, ना वयाची, ना भाषेची, ना राज्याची ना देशाची...

PR
या सर्व सीमा पार करून प्रेमाचे बंध बांधले जातात. प्रेमासाठी गजर असते ती दोन प्रेमळ मनांची. ही मने जुळली की मग सर्व बंधने आणि सीमा आपसुकच गळून पडतात, पण...प्रेमाला विरोध करणारी मंडळी कायम या बंधनातच अडकून पडलेली असतात. याच बंधनातून आपल्या प्रेमाला मुक्त करू पाहणा-या प्रेमवीरांची कथा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे ‘पुणे व्हाया बिहार’ या चित्रपटातून.

नावातच वेगळेपणा असणा-या या चित्रपटाची निर्मिती केली आहे शेमारू एण्टरटेन्मेंट अतुल मारू, केतन मारू यांनी तर दिग्दर्शन केले आहे लेखक- दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी. चित्रपटात उमेश कामत, मृण्मयी देशपांडे, अरूण नलावडे आणि भरत जाधव यांच्या मुख्य भूमिक आहेत.

Pune Via Bihar Trailer


‘पुणे व्हाया बिहार’ ची कथा आहे अभिजीत भोसले आणि तारा यादवची. औरंगाबादच्या इंजिनिअरींग कॉलेजमध्ये शिकणारे हे विद्यार्थी. अभिजीतला तारा मनापासून आवडते पण त्याबद्दलची जाणीव नाहीये. तारा ही बिहारमधील एका प्रतिष्ठित राजकारण्याची मुलगी आहे. वडील स्वत:च्या राजकारणासाठी आणि सत्तेसाठी ताराचा उपयोग करण्याचं ठरवतात. यासाठी बिहारमधील एका बाहुबली नेत्याशी तिचं जबरदस्तीने लग्नं ठरवतात. या च्रकात अडकलेल्या ताराला सोडवण्यासाठी अभिजीत थेट बिहार गाठतो आणि ताराला वडिलांच्या जाळ्यातून सोड्विण्यासाठी प्रयत्न करतो. यामध्ये अभिजीत यशस्वी होतो का ? त्याच्या प्रेमाची जाणीव ताराला होते का ? हे सर्व जाणून घेण्यासाठी सिनेमा बघणे आवश्यक आहे.