कोण आहे गिरिजा ओक? National Crush मराठमोळ्या अभिनेत्रीचा 'तो' इंटिमेट सीन चर्चेत
गिरिजा ओक या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री आहे. त्यांचा जन्म १७ डिसेंबर १९८७ रोजी मुंबईत झाला. तसेच त्या प्रसिद्ध मराठी अभिनेते डॉ. गिरीश ओक यांच्या कन्या आहे. गिरिजाने ठाकुर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, मुंबई येथून बायोटेक्नॉलॉजीमध्ये पदवी प्राप्त केली. तिने गायनाची आवड असल्याने 'सिंगिंग स्टार' या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आणि फायनलिस्टपर्यंत पोहोचली. तिचा विवाह सुहास गोडबोले यांच्याशी झाला आहे.
गिरिजा ओक यांनी मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, मालिका आणि ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर काम केले आहे. गिरिजा ओक या मराठी मालिका 'लज्जा' मधील 'मानसी' या भूमिकेमुळे त्या विशेष प्रसिद्ध झाल्या. व हिंदी चित्रपट 'तारे जमीन पर' आणि 'जवान' मध्येही त्यांनी भूमिका साकारल्या आहे. तसेच 'शोर इन द सिटी'आणि अलीकडील मराठी चित्रपट 'इन्स्पेक्टर झेंडे' मध्येही त्या दिसल्या.
'नॅशनल क्रश' आणि चर्चा (National क्रश)-
सध्या सोशल मीडियावर गिरिजा ओक यांच्या निळ्या साडीतील एका मुलाखतीतील फोटो खूप व्हायरल झाला आहे. त्यांचे साधे आणि आकर्षक सौंदर्य तसेच अभिनय शैलीमुळे त्यांना नेटकऱ्यांकडून 'न्यू नॅशनल क्रश' ही पदवी मिळाली आहे. तसेच त्या लवकरच 'थेरेपी शेरेपी' नावाच्या आगामी वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजमध्ये अभिनेता गुलशन देवैया यांच्यासोबत त्यांचे काही इंटिमेट (Intimate) सीन्स आहे. या इंटिमेट सीन्सबद्दल बोलताना, गिरिजा ओक यांनी एका मुलाखतीत गुलशन देवैयाने सेटवर त्यांची खूप काळजी घेतली आणि सीन करताना त्या कम्फर्टेबल (Comfortable) आहे की नाही, हे त्यांना वारंवार विचारले, असा अनुभव सांगितला. याच इंटिमेट सीनच्या चर्चेमुळेही त्या सध्या प्रकाशझोतात आहे. गिरिजाची साधी, आकर्षक आणि मराठमोळी छबी तरुणाईला भुरळ घालतेय.
Edited By- Dhanashri Naik