सोमवार, 29 सप्टेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. मराठी कलावंत
Written By
Last Modified: मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018 (10:42 IST)

ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांचे निधन

Yashwant Deo
ज्येष्ठ कवी, संगीतकार आणि गायक यशवंत देव यांचे प्रकृती अस्वास्थ्याने, काल रात्री १.३० वाजता निधन झाले.
यशवंत देव उर्फ नाना, हे फार मोठे संगीतकार, गायक आणि कवी होते. त्याही पेक्षा ते एक सहृदयी माणूस होते. शब्दप्रधान गायकीचे जनक असे म्हणायला हरकत नाही. अनेक शिष्य त्यांनी घडविले, अनेक ज्येष्ठ गायकांना मार्गदर्शन केले. त्यांना भेटणे हा निव्वळ अमृतानुभव असायचा. त्यांच्या कडून अनेक किस्से, गमती जमती ऐकायला मिळायच्या. आपल्या पेक्षा वयाने लहान असणाऱ्यालाही ते नेहमी, सन्मानाने वागवायचे. त्यांच्या जाण्याने मराठी संगीत सृष्टीची अपरिमित हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. भावपुर्ण श्रद्धांजली.