शनिवार, 3 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified सोमवार, 3 सप्टेंबर 2018 (15:38 IST)

एका वेळी जन्मलेल्या ४ मुलींपैकी तिघींचा मृत्यू

यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रक्षाबंधनच्या दिवशी दारव्हा तालुक्यातील राणी प्रमोद राठोड हिने एकाच वेळी चार मुलींना जन्म दिला होता जन्मलेल्या चारही मुली जन्मल्यानंतर ह्या सुखरूप होत्या मात्र त्या मात्र या चारही मुली प्री मॅच्युअर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते आज या चार मुलींपैकी तीन मुलींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर एका मुलीची प्रकृती ही चिंताजनक असून तिला कृत्रिम श्वास देण्यात येत आहे या मुलींचे वजन कमी असल्यामुळे व बाहेरील वातावरणाची इनफेक्शन झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली या मुलींना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले होते मात्र डॉक्टरांना अपयश आले. या चारही मुलींना जन्म देणारी आई सध्या यवतमाळ च्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे.