शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: गुरूवार, 30 नोव्हेंबर 2017 (10:41 IST)

टाकाऊपासून टिकाऊ

छोट्या मित्रांनो, आपल्या घरात बर्‍याच नको असलेल्या वस्तू असतात. साफसफाई करताना या वस्तू सापडतात. यातल्या काहीवस्तू भंगारवाल्याला दिल्या जातात तर काही उगाचच ठेवल्या जातात पण या वस्तूंचा वापर करून तुम्ही छान कलाकृती साकारू शकता. घरातल्या कोणत्या वस्तूंपासून काय साकारता येईल? पाहू या.. 
* तुमच्याकहे नको असलेल्या चाव्या असतील तर त्यांचा वापर करून विंड चाईम बनवता येईल. या चाव्या नीट स्वच्छ करा. गंज काढून टाका. या चाव्यांना वेगवेगळे रंग द्या. या चाव्या स्टिलच्या वायरमध्ये अडकवा. वार्‍यामुळे चाव्या हलतील आणि मंजूळ आवाज येईल. 
 
* जुन्या टायर्सचा वापर करून छान कलाकृती साकारता येईल. हे टायर नीट स्वच्छ करा. वाळल्यानंतर टायरला रंग द्या. हा रंग वाळू द्या. या टायरवर तुम्ही कुंड्या ठेऊ शकता. 
 
* जुन्या प्लास्टिकच्या बाटल्या किंवा कंटेनर असतील तर त्यांचा वापर रोपटी लावण्यासाठी करता येईल. घराच्या सजावटीसाठी या बाटल्या वापरता येईल. या बाटल्या मधून कापून घ्या. त्यात थोडी माती भरा. आता त्यात रोपटी लावा. या बाटल्या भिंतीवर अडकवता येतील. 
 
* घराला रंग दिला असेल आणि रंगांचे डबे असतील तर त्यांचा वापरही कुंडीसारखा करता येईल. उरलेला रंग काढून टाका. डबे स्वच्छ करा. या डब्यांना छानसा रंग द्या. आता यात माती भरा, पाणी घाला. यात रोपटी लावता येतील. बाल्कनीत किंवा गॅरलीत हे डबे ठेवा. ते घराची शान वाढवतील.