बुधवार, 9 ऑक्टोबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: मंगळवार, 3 ऑक्टोबर 2023 (09:48 IST)

National Wildlife Week:'राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह', जाणून घ्या संपूर्ण आठवडाभर साजरा होणाऱ्या या कार्यक्रमाचा उद्देश

National Wildlife Week
National Wildlife Week भारतातील वनस्पती आणि प्राणी यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने आजपासून 'राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह' साजरा केला जात आहे. हा कार्यक्रम 8 ऑक्टोबरपर्यंत साजरा केला जाणार आहे.  
 
राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह भारतभर दरवर्षी 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान भारतातील वनस्पती आणि प्राणी यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह (National Wildlife Week)साजरा केला जातो. 2023 मध्ये आम्ही 69 वा वन्यजीव सप्ताह साजरा करत आहोत.
 
वन्यजीव सप्ताहाचा इतिहास
भारतीय वन्यजीव मंडळाची स्थापना करण्यात आली आणि भारताच्या वन्यजीवांचे संरक्षण करण्याच्या दीर्घकालीन उद्दिष्टांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 1952 मध्ये वन्यजीव सप्ताहाची संकल्पना मांडण्यात आली. सुरुवातीला, वन्यजीव दिन 1955 मध्ये साजरा करण्यात आला जो नंतर 1957 मध्ये वन्यजीव सप्ताह म्हणून श्रेणीसुधारित करण्यात आला.