बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: गुरूवार, 8 ऑक्टोबर 2020 (12:33 IST)

टायफून काय असतं?

मागील काही दिवसांपूर्वी जपानमध्ये एक शक्तिशाली टायफून हॅशेन याने फार उच्छाद मांडले होते. या पूर्वी टायफून मायसक ने देखील कोरियाच्या प्रायद्वीपात थैमान मांडला होता. काय आहे हे टायफून.
 
* ट्रॉपिकल सायक्लॉनला चीन समुद्र आणि त्याच्या जवळच्या परिसरात टायफून नावाने ओळखतात. 
* शक्यतो टायफून हे जून ते नोव्हेंबरच्या दरम्यान येतात. जे जपान, फिलिपिन्स, आणि चीन सारख्या देशांना प्रभावित करतात. डिसेंबर ते मे च्या दरम्यान येणाऱ्या टायफून येण्याचे प्रमाण कमी असतात. 
* उत्तरी अटलांटिक आणि पूर्वी प्रशांतच्या भागात सायक्लॉनला 'हॅरिकेन' दक्षिण-उत्तर आशिया आणि चीन मध्ये 'टायफून' आणि दक्षिण पश्चिम प्रशांत आणि हिंद महासागरातील भागाला याला 'ट्रॉपिकल सायक्लॉन म्हणतात.
 
टायफून हॅशेन :
* टायफून हॅशेन ला चिनी भाषेत समुद्र देवाच्या रूपात मानतात.
* टायफून हॅरिकन किंवा ट्रॉपिकल सायक्लॉन ला सेफीर सिप्सन हॅरिकन विंड स्केलच्या आधारावर वाटले गेले आहे. या मध्ये हवेच्या गतीच्या आधारे 1 ते 5 रेटिंग दिली जाते. 
* जाईंट टायफून वार्निंग सेंटरनुसार टायफून हॅशेन 4 थ्या क्रमांकावर ठेवले आहे. कारण यामध्ये हवेची गती सुमारे 230 किमी प्रति/तास वेगानं होती.
 
टायफून मायसक :
* टायफून हॅशेन प्रमाणेच सर्व ट्रॅक्स ला घेत घेत टायफून मायसक कोरियाच्या बेटाला जाऊन धडकला होता.
* टायफून मायसक ला वर्ग श्रेणी 2 मध्ये ठेवले आहेत कारण याचा वेग 165 किमी प्रति तास होता.