गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 जुलै 2022 (10:24 IST)

भरपूर पैसा मिळण्यासाठी करा 11 दिवस हा उपाय

money
जीवनावश्यक वस्तूंच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. परंतु लोकांच्या उत्पन्नात कमी येत आहे. त्यामुळे लोकांना पैशाच्या तंगीचा सामना करावा लागत आहे. या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी कष्ट करणे त्याचबरोबर नशिबाची साथही आवश्यक आहे.
 
नशिबाची साथ मिळवण्यासाठी शास्त्रात अनेक उपाय सांगितले गेले आहेत. हे उपाय केले तर सकारात्मक फळ प्राप्त होते. यामधीलच एक उपाय आहे महादेवाला 11 दिवस नियमित रुद्राभिषेक करणे. महादेवाचे पूजन केल्याने सर्व अडचणी दूर होतात. महादेव भक्तावर लवकर प्रसन्न होऊन त्यांचे सर्व दु:ख नष्ट करतात.
 
11 दिवस नियमित महादेवाच्या मंदिरात जाऊन श्रेष्ठ ब्राम्हणांच्या हाताने शिवलिंगाची पूजा करा. महादेवाला नियमित रुद्राभिषेक करा. या 11 दिवसात आपले आचरण शुध्द ठेवा. रुद्राभिषेक केल्याने महदेवाची कृपा लवकर प्राप्त होते.