स्वप्नात हे दिसल्यास, बनू शकता धनवान
स्वप्न, जे आपण सर्वच बघतो, प्रत्येक स्वप्नाचे फळ वेग-वेगळे असतात. काही स्वप्ने चांगली फळ देतात तर काही स्वप्न वाईट फळ देतात. काही स्वप्न आपल्याला आगाऊ घडणाऱ्या घटनांची सूचना देतात. स्वप्नशास्त्रानुसार, काही स्वप्न असे असतात जे आपल्याला धनप्राप्ती होऊन श्रीमंत होण्याचे सूचित करतात. चला तर मग आपण जाणून घेऊया कोणते स्वप्ने आपल्याला श्रीमंत होण्याची सूचना देतात.
* स्वप्नात उंदीर दिसल्यास -
स्वप्नात उंदीर दिसल्यास शुभ असतं. जर आपण देखील आपल्या स्वप्नात उंदीर बघता तर समजावं की येणाऱ्या काही दिवसातच आपले दारिद्र्य दूर होऊन आपल्या कडे धन येणार आहे. जर आपण हे स्वप्न बघितले असल्यास, तर या स्वप्नाच्या विषयी सर्वात आधी आपल्या घरातील सर्वात लहान मुलाला आवर्जून सांगा.
* रिकामे भांडे भरलेलं बघणं -
स्वप्नशास्त्रानुसार, जर आपण स्वप्नात रिकामे भांडे भरलेलं बघत असल्यास, हे शुभ चिन्हे आहेत. हे स्वप्न आपणास येणाऱ्या दिवसात आर्थिक लाभ मिळविण्याचे सूचक आहे. हे स्वप्न आपल्याला श्रीमंत होण्याचे संकेत देतात.
* स्वप्नात गायीच्या शेणापासून गवऱ्या बनविणे -
स्वप्नात स्वतःला गायीच्या शेणापासून गवऱ्या बनवताना बघितल्याने माणूस प्रगती करतो. असे म्हणतात की हे स्वप्न दारिद्र्य तर कमी करतच शिवाय हे यशाच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडथळ्यांना दूर देखील करतं. या स्वप्नाबद्दल कोणाला ही सांगू नका.
* स्वप्नात केरसुणी बघणं -
स्वप्नात केरसुणी बघणे अति शुभ मानले जाते. असे म्हणतात की केरसुणी हे घराच्या वैभवाचे प्रतीक आहे. मानले जाते की जर स्वप्नात झाडू किंवा केरसुणी दिसल्यास हे समजावं की आपल्या घरातून दारिद्र्य लवकरच जाणार आहे आणि धनागमनाचे योग येत आहे. या स्वप्नाविषयी आपल्या आई किंवा पत्नीला जरूर सांगा.
* इलेक्ट्रॉनिक सामान तुटताना बघणं :
जर आपण आपल्या स्वप्नात एखाद्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तुटलेल्या अवस्थेत बघितले असल्यास हे स्वप्न खूप शुभ असतं. तथापि, या स्वप्नाबद्दल कोणालाही सांगू नये पण जर का आपण स्वप्नात इलेक्ट्रॉनिक सामानाला बघतात तर हे दारिद्र्याचे सूचक आहे.