स्वप्नांवरुन जाणा तुमचे भविष्य..
प्रत्येकालाच कधी ना कधी स्वप्न पडत असतेच. अनेकवेळा ते चांगले असते किंवा वाईट असते. चांगली स्वप्ने आपल्याला आनंदित करतात अर्थात वाईट स्वप्ने आपला दिवस खराब करण्यासाठी पुरेशी असतात. पण, या स्वप्नांना खरंच काही अर्थ असतो का. आपल्या पुढील आयुष्याबाबत या स्वप्नांमध्ये काही दडलं असते का? या स्वप्नांचा अर्थ आपल्याला कळाला तर भविष्यात घडणार्या घटनांची आपल्याला पूर्वकल्पना येऊ शकते का? या आणि अशा अनेक प्रश्नांचे काही प्रमाणात उत्तर ‘हो’ असेच आहे. कारण स्वप्न आणि नेमक्या भविष्यात त्याच्याशी साधर्म्य असणार्या घटना माणसाच्या आयुष्यात घडत असतात. तुम्हालाही जाणून घ्यायचंय तुम्हाला पडलेल्या स्वप्नांचा अर्थ.. मग हे वाचाच...
स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला स्वत: उंच भींतीवर बसलेले पाहील्यास सुख-संपत्ति प्राप्त होते. एखाद्या पुरुषाला स्वत:च्या वया पेक्षा मोठे झालेले दीसले तर त्याला मान-सम्मान प्राप्त होतो. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला गाय, बैल, पक्षी, हत्ती यांच्यावर चढून स्वत: जर समुद्र पार करताना पाहील्यास त्याला जास्त मोठा अधीकार प्राप्त होण्याचा योग बनतो.
पुरुषाला डोक्यावर घर जळताना दीसले, तर त्याला अधीकार प्राप्त होण्याचा योग बनतो. एखाद्या पुरुषाला कानात कुंडल, डोक्या वर मुकुट व गळ्यात मोत्याची माळ घातलेली दीसेल त्याला उच्चाधीकार व त्यातून लाभ प्राप्त होतात. शत्रूंना पराजीत करतानाचे स्वप्न पुरुषाला पडल्यास त्याला बढती मिळते.
कमळाच्या पानावर बसून स्वत: खीर खाताना पाहीले तर त्याला राजकीय पद, मंत्रीपद मिळू शकते.
एखाद्या स्त्रीला जर स्वप्नात आपल्या योनिचे क्षेत्र विकसित होतान दीसले तर तीला निश्चीतच कोणत्या तरी पुरुषाची संपत्ती प्राप्त होण्याचा योग असतो. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला टक्कल पडलेले दिसले तर त्याला अमुल्य धनप्राप्ती होते.
स्वप्नामध्ये जर एखाद्या पुरुषाला कुंभार मडके बनवताना दिसल्यास त्याचे स्वत:चे दूख: लवकरच दूर होणार व धनलाभ होणार असे समजावे.
स्वप्नात रडणारे बालक दीसणे आजारपण व निराशा यांची सूचना देते. एखाद्या स्त्रीला जर स्वप्नात स्वत:ला टक्कल पडलेले दीसले तर गरीबीचा सामना करण्याचे योग संभवतात. एखाद्याला स्वप्ना मध्ये जर स्वत:स दुर्घटना घडताना दीसली तर लवकरच आजार पण संभवते.
एखाद्याला स्वप्ना मध्ये जर स्वत: आरशे फोडत असल्याचे दीसते त्याच्या परीवारात कोणाचा तरी मृत्युसम संकट येते. एखाद्याला स्वप्ना मध्ये जर स्वत:ची नाव तूफानी वादळात फंसलेली दीसल्यास येणारा काळ पुर्ण असण्याची ही सूचना समजावी.
एखाद्याला स्वप्ना मध्ये जर स्वत: कडू औषध घेताना पाहील्यास जीवनात अनेक प्रकारच्या समस्या येण्याचे संकेत आहेत. एखाद्याला स्वप्ना मध्ये जर मुंग्याना स्वत: मारताना पाहिल्यास व्यापार नाश संभवतो.
एखाद्याला स्वप्नामध्ये जर स्वत: प्रवासा साठी वाहनद्वारे जाण्याची तयारी करताना दिसल्यास त्याला योजलेला प्रवास रद्द केलेलाच बरा कारण अपघात भय दीसते.
-------
टीप : लेखातील दिलेली माहिती ही ढोबळमानाने मिळणार्या संकेतावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे हे असेच घडते अथवा घडेल असे नाही, केवळ अंदाज बांधण्यासाठी म्हणून या माहितीची उपयोग होऊ शकतो.