मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

या प्रकारे चुकवा मातृ ऋण

लाल किताब यानुसार कुंडलीत अनेक प्रकाराचे ऋण असतात. जसे पितृ ऋण, जालिनाम ऋण, निसर्ग ऋण, अजन्मा ऋण इतर... त्यातूनच एक असतं मातृ ऋण. लाल किताबानुसार सर्वात विचित्र बाब म्हणजे आपल्या कुंडलीत यातून कोणतेही ऋण असल्यास अनेक नातलगांच्या कुंडलीत देखील ते ऋण असतील. याचा अर्थ पूर्ण कुटुंब या ऋणामुळे प्रभावित असतो. आपणं बघितले असेल की घरात एका सदस्याला पितृदोष असल्यास जवळपास सर्वांच्या कुंडलीत या प्रकाराचा दोष दिसून येतो. तर पूर्ण कुटुंबाला यापासून मुक्तीसाठी आज जाणून घ्या मातृ ऋणाबद्दल:
 
मातृ ऋण-
स्थिती- लाल किताब यानुसार जेव्हा केतू कुंडलीत चौथ्या भावात असेल तर कुण्डली मातृ ऋणाने प्रभावित मानली जाते. यानुसार चौथ्या घराचा स्वामी चंद्रमा आहे आणि चंद्रमाच्या घरात केतू आल्यास, तो चौथा भाव दूषित झाल्यामुळे, चंद्रमाला ग्रहण लागतं. अशात व्यक्तीवर मातृ ऋण चढतं.
 
कारण- कुंडलीच्या या तथ्यामागील एक कारण हे देखील असू शकतं की आपल्या पूर्वजांनी एखाद्या आईला उपेक्षित केलं असेल किंवा तिच्यावर अत्याचार केला असेल किंवा मुलं जन्माला आल्यावर आईला तिच्या मुलांपासून लांब ठेवले असेल किंवा एखाद्या आईच्या निराशाकडे दुर्लक्ष केले गेले असेल.
 
लक्षण- मातृ ऋणाने जातक कर्जात बुडतो. अशात घरातील शांती भंग होते. व्यक्ती सुख-शांतीने जेवू पात नाही. मातृ ऋणामुळे व्यक्तीला कोणाचीही मदत मिळत नाही. साठवलेले धन बरबाद होऊन जातं. वायफळ खर्च होतात. कर्ज फेडणे कठिणं जातं.
 
या व्यतिरिक्त जवळपासच्या विहीर किंवा नदीत पूजा करण्याऐवजी त्यात घाण, कचरा जमा होत असेल तरी मातृ ऋण प्रारंभ होतं. आईकडे दुर्लक्ष करणे, तिच्या सुख दु:खाची काळजी न करणे, संतान जन्मानंतर तिला घरातून हाकलून देणे या कारणांमुळे ऋण लागतं. 
 
मातृ ऋण: कारण, लक्षण आणि निवारण
निवारण-
1. आई किंवा आईसमान महिलेची सेवा करा.
2. वृद्धाश्रमात जाऊन वृद्ध महिलांना खीर खाऊ घाला.
3. वाहत्या पाण्यात किंवा नदीत एक चांदीचा शिक्का टाका.
4. नित्य दुर्गा देवीच्या मंदिरात जाऊन पूजा करा. देवीला वस्त्र अर्पित करा.
5. आपल्या मुली किंवा मुलीसमान मुलींची सेवा करा. म्हणतात पुत्री जन्माला आल्यास मातृ ऋण काही प्रमाणात कमी होतं. 
6. आपल्या सर्व रक्तासंबंधी म्हणजे सख्खे नातेवाइकांकडून समप्रमाणात चांदी घेऊन एखाद्या नदीत प्रवाहित करावी. चांदी वाहणे शक्य नसल्यास तांदूळ प्रवाहित करू शकता. हे काम केवळ एकदा करायचे आहे.