सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

Rahu Dosh: मुक्तीसाठी सोपे उपाय, दूर होईल वाईट काळ

आपल्या कुंडलीत राहू दोष असल्यास आपल्याला याचे वाईट परिणाम दिसून येतील. परंतू समस्या ही आहे की आपण कसे ओळखाल की राहू दोष आहे. याचे लक्षण म्हणजे मानसिक ताण, आर्थिक नुकसान, स्वत:बद्दल चुकीची समज, लोकांशी वाद, राग, वाणीत कठोरता, अपशब्द बोलणे किंवा हाताचे नखं आपोआप तुटणे, केस गळणे हे राहू दोष असल्याचे लक्षण आहेत. यासोबतच वाहन दुर्घटना, पोटात समस्या, डोकेदुखी, खाद्य पदार्थात केस येणे, अपयश, संबंध खराब होणे, मनावर ताबा नसणे हे देखील कुंडलीत राहूची स्थिती खराब असल्याचे संकेत आहेत. 
 
* आपण देखील यापासून परेशान असाल तर काही उपाय अमलात आणून राहू शांत करू शकता:
* राहू ग्रह शांतीसाठी शुक्रवारी गोमेद पंचधातू किंवा लोखंडी अंगठीत धारण करावे. शनिवारी राहू बीज मंत्राने अंगठी अभिमंत्रित करून उजव्या हाताच्या मध्यमा बोटात अंगठी धारण करावी. 
* अंगठीत घालताना राहू बीज मंत्र: ॐ भ्रां भ्रीं भ्रौं स: राहवे नम: 108 वेळा जप करावा.
* कुंडलीत राहू अशुभ स्थिती असल्यास शांती हेतू ॐ रां राहवे नमः मंत्राची एक माळ दररोज जपावी.
* घरात राहू यंत्राची स्थापना करून विधिपूर्वक पूजा करावी.
* शनिवारी उपास करावा. याने राहूचा दुष्प्रभाव कमी होतो.
* शनिवारी कावळ्याला गोड पोळी खाऊ घालावी. तसेच ब्राह्मण आणि गरिबांना तांदूळ खाऊ घालावे.
* दुर्गा चालीसा पाठ करावा.
* पक्ष्यांना बाजरी खाऊ घाला.
* वेळोवेळी सप्तधान्य दान करावे.
* एका नारळ अकरा अख्खे बदाम काळ्या वस्त्रात गुंडाळून वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे.
* महादेवाला अभिषेक करावा.
* आपल्या घराच्या नैरृत्य कोपर्‍यात पिवळ्या रंगाचे फुल लावावे.
* राहूची दशा असल्यास कुष्ठ आजारामुळे त्रस्त व्यक्तीची मदत करावी.
* गरीब व्यक्तीच्या मुलीचं लग्न लावून द्यावं.
* राहूची दशा शांत करण्यासाठी झोपताना उशाशी जवस ठेवावी. सकाळी दान करावी.
* देवी सरस्वतीची पूजा करावी. ऊं ऐं सरस्वतयै नम: मंत्राचा 108 वेळा जप करावा.
* देवी सरस्वतीच्या चरणी सलग 6 दिवस निळ्या फुलांची माळ अर्पित करावी.
* तांब्याच्या भांड्यात गूळ, गहू भरून पाण्यात प्रवाहित करावं.
* राहूच्या शांतीसाठी लोखंडी वस्तू, निळे वस्त्र, कांबळे, तीळ, मोहरीचे तेल, इलेक्ट्रिक समाना, नारळ व मुळी दान करणेही योग्य ठरतं.
* राहू दोष असणार्‍यांनी पांढर्‍या चंदनाची माळ घालावी. 
* कुणाचीही खोटी शपथ खाऊ नये.
* संधीकाळात म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त दरम्यान कोणतेही महत्त्वाचे काम करू नये.
* मदिरा आणि तंबाखू सेवन केल्याने विपरित परिणाम मिळतात म्हणून राहू दोष असल्यास याचे सेवन टाळावे.