मेष राशीच्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो !
तुमच्याजवळ खूपच धाडस धैर्य कार्यतत्परता आहे, तसेच तुम्ही अतीशय तापट आहात. मेंढयाप्रमाणे दे धडक बेधडक असे तुम्ही आहात. आपल्यातील क्षमता दाखवून दयायला तुम्हाला आवडते, आपुनबी क्या चीज है. हम भी किसीसे कम नही. समोरच्याला जे काही बोलायचे ते त्याच्या तोंडावर सडेतोडपणे बोलणार हे तुमचे तत्त्व. लपाछपी तुम्हाला आवडत नाही त्याचा मनापासून तुम्हाला तिटकारा आहे. तुमच्याकडे खूपच स्पष्टवक्तेपणा आहे.
तुम्ही खूपच उत्साही आहात चैतन्याने सळसळणारे. तुमच्या मनगटामध्ये जोर आहे. लाथ मारीन तिथे पाणी काढीन म्हणायची ताकद, आणि जग जिंकण्याची जिद्द, महत्वाकांक्षा तुमच्याकडे आहे. प्रयत्नावरती तुमच्या विश्वास आहे. कोणत्याही प्रसंगामध्ये न डगमगता मार्ग काढता कठिणातल्या कठीण परिस्थितीमध्येही तुमची हिंमत टिकून राहते.
तुम्ही प्रेमाच्या बाबतीतही तितकेच अग्रेसर आहात.
मेंढयाच्या शिंगाला हात लावला तर धडक आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवलात तर प्रेम. प्रेम द्यावे आणि घ्यावे हे निसर्गाचे तत्व आहे आणि या तत्वाप्रमाणे तुम्ही जोडीदारावरती प्रेम करता. पण जोडीदाराला समजून घ्यायला, तुम्हाला समजत नाही. हा तुम्ही जोडीदाराची काळजी मनापासून घेतात.