गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

शनी जयंती: राशीनुसार उपाय करा, अडचणी दूर होतील

शनीदेव कर्म आणि सेवेचे कारक आहे अर्थात यांचा सरळ प्रभाव व्यक्तीच्या नोकरी आणि व्यवसायावर पडतो. म्हणून नोकरी आणि व्यवसायातील अडचणी किंवा कष्ट दूर करण्यासाठी शनी जयंतीला आपल्या राशीनुसार उपाय अमलात आणू शकता... तर जाणून घ्या 12 राशींनुसार शनी जयंतीचे अगदी सोपे उपाय....
 
मेष
शनी जयंतीला आपल्या घरात श्री शिव रुद्राभिषेक करवावे.
 
वृषभ
शनी जयंतीला महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.
 
मिथुन
शनी जयंतीला महाराज दशरथकृत नील शनी स्तोत्र पाठ अवश्य करावा.
 
कर्क 
शनी जयंतीला एका लोखंडी वाटीत मोहरीचे तेल घेऊन त्यात आपली सावली बघून छाया दान करावे.
 
सिंह
शनी जयंतीला काळे तीळ आणि अख्खे उडीद दान करावे.
 
कन्या
शनी देवाचे बीज मंत्र 'ॐ प्रां प्रीं प्रौं स: शनैश्चराय नम:' याचे नियमित जप करावे.
 
तूळ
शनी जयंतीला तसेच नियमित देखील शमी वृक्षाला जल अर्पित करून पूजा करावी.
 
वृश्चिक
शनी जयंती व्यतिरिक्त प्रत्येक दिवशी एखाद्या गरीब किंवा असहाय व्यक्तीची यथासंभव मदत करावी.
 
धनू
शनी जयंतीला मुंग्या येत असतील या ठिकाणी साखर आणि गव्हाचे पीठ टाकावे.
 
मकर
शनी जयंतीला महाराज दशरथकृत नील शनी स्तोत्राचे पाठ अवश्य करावे.
 
कुंभ
शनी जयंतीला शनी नक्षत्र आणि शनीच्या होरामध्ये उत्तम गुणवत्ता असलेले नीलम रत्न धारण करावे.
 
मीन
आपल्याहून लहानांसोबत चांगला व्यवहार करावा आणि एखाद्या धार्मिक स्थाळाच्या मुख्य दाराची स्वच्छता करावी.