1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: बुधवार, 2 जून 2021 (08:35 IST)

Panchak पंचकचे 5 रहस्य जाणून घ्या

पंचांगाप्रमाणे दर महिन्यात पाच असे दिवस असतात ज्यात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. असा विश्वास किंवा श्रद्धा आहे की या दिवशी मरण पावलेले लोक कुटुंबातील इतर पाच सदस्यांनाही सोबत घेऊन जातात. तर चला जाणून घ्या पंचकचे पाच रहस्य-
 
पंचक काय आहे- ज्योतिषशास्त्रानसार, पाच नक्षत्रांच्या विशिष्ट कालावधीला पंचक म्हटले जाते. चन्द्र ग्रहाचं धनिष्ठा नक्षत्राच्या तृतीय चरण आणि शतभिषा, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद आणि रेवती नक्षत्राच्या चारी चरणांमध्ये भ्रमण काळ पंचक काळ मानलं जातं. याप्रकारे चन्द्र ग्रहाचं कुंभ आणि मीन राशीत भ्रमण पंचकला जन्म देतं. पंचक कालावधीत कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. पंचक कालावधी हा अमंगलाचे सूचक मानला गेला आहे.
 
पंचक नक्षत्रांचा प्रभाव:-
1. धनिष्ठा नक्षत्रात आग लागण्याची भीती असते.
2. शताभिषा नक्षत्रात मतभेद होण्याची शक्यता असते.
3. पूर्वाभाद्रपद नक्षत्रात आजार वाढण्याची शक्यता असते.
4. उत्तरा भाद्रपद नक्षत्रात धनाच्या रुपता दंड होतो.
5. रेवती नक्षत्रात धन हानिची शक्यता असते.
 
​पंचक कालावधीत काय करू नये-
पंचकात पेंढा आणि लाकूड गोळा केल्याने अग्नी भय, चोरीची भीती, रोग भीती, राज भय आणि तोटा संभवतो.
 
 
1. लाकडाची खरेदी करू नये किंवा लाकडं गोळा करु नये.
2. घराच्या छताच्या दुरुस्तीचे किंवा नवीन बांधकाम करू नये. 
3. दाह संस्कार.
4. पलंग विकत घेणे टाळावे.
5. दक्षिण दिशेकडे प्रवास करु नये. 
 
 
उपाय : पंचक काळाच्या लाकडाची खरेदी करणे सक्तीचे असल्यास गायत्री मातेच्या नावाने हवन करा.
घरावर छप्पर घालणे आवश्यक असेल मजुरांना मिठाई खाल्ल्यानंतर छताचे काम करा.
पंचक काळात अंत्यसंस्कार करणे बंधनकारक असेल तर प्रेत जाळताना पाच वेगवेगळे पुतळे तयार करा आणि त्यांना देखील अवश्य जाळावे.
पंचक काळात पलंग खरेदी करणे आवश्यक असेल तर पंचक काळ संपल्यावरच त्याचा वापर करावा.
पंचक काळात दक्षिण दिशेकडे प्रवास करणे आवश्यक असल्यास हनुमान मंदिरात फळ अर्पित करुन प्रवास प्रारंभ करावा. अशात पंचक दोष दूर होतं.
 
पंचक चे प्रकार-
1. पंचकचा प्रारंभ रविवारी होत असल्यास त्याला रोग पंचक म्हणतात.
2. पंचकचा प्रारंभ सोमवारी होत असल्यास त्याला राज पंचक म्हणतात.
3. पंचकचा प्रारंभ मंगळवारी होत असल्यास त्याला अग्नी पंचक म्हणतात.
4. बुधवारी आणि गुरुवारी लागणाऱ्या पंचकाला दोषमुक्त पंचक म्हटले जाते. 
5.  पंचकचा प्रारंभ शुक्रवारी होत असल्यास त्याला चोर पंचक म्हणतात.
6. शनिवारपासून लागणाऱ्या पंचकाला मृत्यू पंचक म्हटले जाते.
 
पंचक काळात मृत्यू होणे शुभ मानले जात नाही. कारण पंचक कालावधीत मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या जीवितहानीची शक्यता असते. पंचकात जन्म-मरण आणि पाच सूतक आहे. पंचक दोष लागू नये, यासाठी काही उपाय शास्त्रात सांगितले गेले आहेत. पंचक कालावधीत कोणाचा मृत्यू झाला, तर ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, त्याचे अंतिम संस्कार करताना दर्भाचे एक प्रतीक तयार करून त्याचा दाहसंस्कार मृतकासोबत करण्याचे विधान आहे, असे सांगितले जाते. जन्म आनंद आहे आणि या नक्षत्रांचे तथाकथित फळ, ग्रह इत्यादींमध्ये विभागलेले, पाच घरांमध्ये होणार आहेत. तर स्पष्ट आहे की तेथे विविध प्रकाराचे सुख येऊ शकतात. पाच मृत्यूंचा अर्थ पाहिल्यास रोग, वेदना, दु: ख इत्यादी पाच घरांमध्ये येऊ शकतात. कारण व्यथा, दुःख, भय, लज्जा, रोग, शोक, अपमान आणि मरण- मृत्यूचे आठ भेद आहेत. याचा अर्थ पाच लोकांचा मृत्यूचं असा नव्हे तर पांचीना एखाद्या प्रकारचे रोग, दु: ख किंवा वेदना सहन कराव्या लागू शकतात. 

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश