फास्ट फूड खाणे धोक्याचे
जर तुम्ही मोठय़ा प्रमाणात फास्ट फूडचे सेवन करीत असाल तर सावधान ! याचे अधिक सेवन तुमच्या हार्मोन्सवर थेट आघात करू शकतात. अमेरिकेतील जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठाने केलेल्या एका सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. विद्यापीठाच्या टीमने 8800 जणांवर रिसर्च करून हा निष्कर्ष काढला असून 24 तासात जवळपास 34% नागरिकांच्या कॅलरी झपाटय़ाने कमी झाल्याचे आढळले. तर 40 % नागरिकांच्या शरीरातील ऊळछझ मोठय़ा प्रमाणात वाढल्याचे आढळले.
शरीरातील DINP वाढल्याने पेटलेटस् कमी होतात. तसेच शरीरात अँसिडचे प्रमाण वाढून ते थेट हामरेन्सवर आघात करत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या संशोधनादरम्यान अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले असून फास्ट फूडचे सेवन मानवी शरीराला घातक आहे. ते थेट हार्मोन्सवर आघात करत असल्याचे दिसून आले, असे या रिसर्चला मार्गदर्शन करणारे विद्यापीठाचे प्राध्यापक अमी झोटा यांनी सांगितले.