सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: सोमवार, 31 मे 2021 (10:53 IST)

Facts About Tobacco : तंबाखूशी संबंधित 14 तथ्य

नशा शान आणि सवयीचा भाग असला तरी आयुष्यात अवेळी येणार संध्याकाळ याचे मुख्य कारण आहे, ज्याने आपल्या कुटुंबाच्या जीवनात देखील अंधार होतो. काही क्षणांचा मजा आयुष्यभराची सजा होते. 
 
मागील काही वर्षांमध्ये भारतातसह संपूर्ण जगभरात धूम्रपान करणार्‍यां आणि त्यामुळे आजारी पडणार्‍यांच्या संख्येत वाढ झाली आहे. या गंभीर व्यसनामुळे बर्‍याच लोकांचा मृत्यू झाला. त्यांचे गंभीर परिणाम लक्षात घेता अनेक संस्था धूम्रपान करण्याच्या हानीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढे आल्या आहेत.
 
तंबाखू व धूम्रपानांचे दुष्परिणाम लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य देशांनी यासाठी प्रस्ताव ठेवला, त्यानंतर दरवर्षी तंबाखू दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
तंबाखूशी संबंधित काही तथ्य -
 
1. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते जगातील सुमारे १२ देशांमध्ये तंबाखूचे उत्पादन होते.
 
2. जगभरात दरवर्षी सुमारे 5.5 ट्रिलियन सिगारेट तयार होतात आणि एक अब्जाहून अधिक लोक त्याचा वापर करतात.
 
3. अहवालानुसार जगभरात 80 टक्के पुरुष तंबाखूचा वापर करतात, परंतु काही देशांमध्ये महिलांमध्ये धूम्रपान करण्याची सवय लक्षणीय प्रमाणात वाढली आहे.
 
4. जगभरातील सुमारे 10% धूम्रपान करणार्‍यांची संख्या भारतात आहे, या अहवालानुसार भारतातील सुमारे 25 हजार लोक गुटखा, बीडी, सिगारेट, हुक्का इत्यादी माध्यमातून तंबाखूचे सेवन करतात.
 
5. भारतात 10 अब्ज सिगारेट आणि 72 कोटी 5 दशलक्ष किलो तंबाखूचे उत्पादन होते.
 
6. ब्राझील, चीन, अमेरिका, मलावी आणि इटलीनंतर तंबाखूच्या निर्यातीच्या बाबतीत भारत सहाव्या क्रमांकावर आहे.
 
7. विकसनशील देशांमध्ये, दरवर्षी 8000 मुलांचा मृत्यू पालकांद्वारे करण्यात येत असलेल्या धूम्रपानांमुळे होते.
 
8. जगातील इतर कोणत्याही देशांच्या तुलनेत भारतात तंबाखूजन्य आजाराने मृत्यू पावणार्‍यांची संख्या वेगाने वाढत आहे.
 
9. कोणत्याही प्रकारचे धूम्रपान हे 90 टक्क्यांहून अधिक फुफ्फुसाचा कर्करोग,  ब्रेन हेमरेज आणि अर्धांगवायूसाठी प्रमुख कारण आहे.
 
10. सिगारेट आणि तंबाखू - तोंड, पाठीचा कणा, घसा आणि मूत्राशय कर्करोगच्या रुपात प्रभावी ठरतं.
 
11. सिगारेट आणि तंबाखूमध्ये उपस्थित कर्करोगयुक्त पदार्थ शरीरातील पेशींच्या वाढीस प्रतिबंध करतात आणि त्यांचा नाश आणि कर्करोगाच्या निर्मितीस मदत करतात.
 
12. दीर्घकाळ धूम्रपान केल्याने तोंड, गर्भाशय, मूत्रपिंड आणि पाचक ग्रंथीमध्ये कर्करोग होण्याची शक्यता असते.
 
13. हृदय आणि मेंदूच्या आजारांचे मुख्य कारण म्हणजे धुम्रपान करणे आणि धुराच्या नकळतपणे संपर्कात येणे.
 
14. धूम्रपानाच्या धुरातआढळणारे निकोटीन, कार्बन मोनो आक्साइड सारखे पदार्थ हृदय, ग्रंथी आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजर होण्याची शक्यता वाढवतात. 
 
भारतात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी आहे, तरीही कायदा व सुव्यवस्था बिघडल्यामुळे ती लागू केली जात नाही. भारतातील आर्थिक बाबींविषयीच्या संसदीय समितीने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमास यापूर्वीच मान्यता दिली आहे. तंबाखू नियंत्रण कायदा प्रभावीपणे राबविणे आणि तंबाखूच्या हानिकारक प्रभावांविषयी जनजागृती करणे हे यामागील उद्दीष्ट आहे.