1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: सोमवार, 31 मे 2021 (10:37 IST)

धूम्रपान करणार्‍यांसाठी कोरोना धोकादायक का आहे, WHO ने दिली कारणे

ऑक्सिजनच्या अभावामुळे होणार्‍या या साथीच्या आजाराची दुसरी लाट आणि फुफ्फुसांचे निरोगी आरोग्य राखण्याची गरज नव्याने वाढली आहे.
 
जागतिक आरोग्य संस्था (WHO) च्या म्हणण्यानुसार, धूम्रपान केल्याने फुफ्फुसांचे नुकसान होणर्‍यांमध्ये कोविड आणि त्याचा मृत्यू होण्याचा धोका 50 टक्के जास्त असतो.
 
जागतिक आरोग्य संस्थेचे महानिदेशक डॉ. टेड्रोस अधनोम घेब्रेयेसस 28 मे रोजी जाहीर करण्यात आलेल्या एका प्रकाशनात म्हणतात की धूम्रपान करणार्‍यांमध्ये कोरोनाची तीव्रता आणि मृत्यूचा धोका 50 टक्क्यांपर्यंत जास्त आहे,म्हणून कोरोनाव्हायरसचा धोका कमी करण्यासाठी धूम्रपान सोडणे चांगले आहे. धूम्रपान केल्याने कर्करोग, हृदयरोग आणि श्वसन रोगांचा धोका देखील वाढतो.
 
या संदर्भात, डॉक्टर आणि तज्ज्ञांनी असे सांगितले की आज धूम्रपान करणार्‍यांनी कोविड महामारी ही व्यसन सोडण्याचे आणखी एक कारण म्हणून पाहिली पाहिजे. कोविड तीव्रतेने ग्रस्त असलेल्या आणि फुफ्फुसांची क्षमता कमी होत असलेल्या रूग्णांविषयी माहिती घेऊन त्यांना निरोगी फुफ्फुसांचे महत्त्व समजले पाहिजे आणि त्यांच्या फुफ्फुसांना या मंद विषापासून बचाव करण्याची प्रतिज्ञा घ्यावी.
 
सीनियर कंसल्टेंट, हेड एंड नेक, ब्रेस्ट एंड थोरॅसिक ओन्को सर्जरी युनिट, डॉक्टर राजेश जैन, यांच्यानुसार कोविड किंवा फुफ्फुसांशी संबंधित कोणत्याही संसर्गाच्या संदर्भात, प्रथम समजून घ्या की फुफ्फुसे जितके निरोगी असतील संसर्ग झालेल्या व्यक्तीची पुनर्प्राप्ती करण्याची क्षमता तितकीच चांगली असेल. अशा परिस्थितीत धूम्रपान करणार्‍याची फुफ्फुसे तुलनात्मकदृष्ट्या कमकुवत राहिल्यास कोविड संसर्गा नंतर गंभीर निमोनिया होण्याचा धोका जास्त असतो.
 
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे तज्ज्ञ डॉक्टरांप्रमाणे कोणतीही व्यसन सोडण्यासाठी प्रथम पायरी म्हणजे स्वत: ला मानसिक रुपाने तयार करणे. ज्यांना हे वाईट व्यसन सोडायचे आहे त्यांच्यासाठी ती काही लहान पावले सुचवते. त्यांच्या मते, "एकाच वेळी एकच सिगारेट खरेदी करा, एकाच वेळी संपूर्ण सिगारेट ओढण्याऐवजी अर्धी ओढून सोडून देण्याची सवय लावा. ती सोडण्याची तारीख निश्चित करा किंवा आठवड्यातून एक दिवस न पिण्याचं ठरवा आणि हळू हळू एक ते दोन दिवस आणि नंतर दोन ते तीन दिवस अशा प्रकारे दिवस वाढवा. या उपाययोजना व्यतिरिक्त, निकोटीन च्युइंगम गम चावत राहणे देखील तंबाखूच्या त्रासावर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकते.
 
धूम्रपान करणार्‍यांसाठी कोविड-19 अधिक धोकादायक असल्याचं मोठं कारण हेच आहे कीत्याचं शरीर व्हायरसच्या हल्ल्याचा प्रतिरोध करण्यात सक्षम नसतं आणि फुफ्फुस कमकुवत असल्याने त्यांना इतरांपेक्षा ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता अधिक असते. संसर्गापासून मुक्तता झाल्यानंतर फुफ्फुसातील रोग बरे होण्याची शक्ती कमी होते, कोव्हीडचा नसा आणि स्नायूंवर होणारा परिणाम धूम्रपान केल्यामुळे आणखी तीव्र होऊ शकतो कारण तंबाखूमुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होते. तीन इंची तंबाखूने भरलेली सिगारेट इतकी हानिकारक असेल तर ती टाळण्यासाठी जागतिक तंबाखू दिनापेक्षा चांगली संधी निश्चितच कुठे सापडेल.