तुम्हीपण लिक्विड सोप वापरता? तर एकदा परत विचार करा!
ज्या अँटीबॅक्टेरिअल अर्थात जीवाणूविरोधी जेलचा वापर तुम्ही नियमित करता, त्याचा खरंच परिणाम होतो का? जर तुम्ही ट्रेन, जिम, ऑफिस किंवा रिसॉर्टमध्ये जीवाणूंबाबत चिंताग्रस्त असाल आणि त्यांना हॅण्ड जेलद्वारे मात देण्याचा विचार करत असाल तर पुन्हा एकदा विचार करा.
खरंतर लिक्विड हॅण्ड जेल तुम्हाला मानसिकदृष्ट्या समाधान देईल, पण त्याचा प्रभाव फार नसतो. अनेक वेळा तर त्याचा उलट परिणाम होतो. पण तुम्हाला लिक्विड हॅण्ड जेलबाबत जेवढी माहिती आहे, तेवढीच खरी आहे का?
जीवाणूंपासून सावधान!
लिक्विड हॅण्ड जेलची लोकप्रियता प्रत्येक देशात आहे. बिटनमध्ये एक तृतीयांश लोक महिन्याला एकदा तरी लिक्विड जेल नक्कीच खरेदी करतात. हॅण्ड जेलमध्ये ६० टक्के अल्कोहल असतं.
जर याचा वापर मोठ्या प्रमाणात करत असाल, तर जीवाणू तात्काळ नष्ट होतात. पण दीर्घ काळासाठी त्याचा खरा परिणाम फार वेगळाच असतो.
तुमच्या हातावर मातीचं किती प्रमाण आहे यावर लिक्विड हॅण्ड जेलचं यश अवलंबून असतं. न्यूरोव्हायरस आणि सी. डिङ्गिसाईलवर लिक्विड हॅण्ड जेलचा ङ्गारसा परिणाम होत नाही. खरंतर पाणी आणि साबणाने हात धुणं जास्त परिणामकारक ठरतं.
हॅण्ड जेल हानिकारक आहेत?
अभ्यासानुसार, हॅण्ड जेल तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतं. यात ट्रायकोल्सन असतं, ज्यामुळे हॉर्मोनमध्ये बदल होतात. इतकंच नाही तर यामुळे जीवाणू प्रतिकारशक्ती कमी होते.
ट्रायकोल्सनमुळे पोट आणि आतड्यामध्ये अडचणी निर्माण होतात. हे मुलांपासून दूर ठेवावं, कारण यामुळे उलट्यांचा त्रास होण्याची शक्यता असते.