टूथपिकमुळे दातांना धोका कसा होऊ शकतो, जाणून घ्या
दातांच्या फटींत अडकलेले अन्नकण टूथपिकच्या साह्याने काढताना हिरड्यांना इजा होऊ शकते. हिरड्यांना सूज येणे, रक्त येणे यासारखे धोके संभवतात. टूथपिकमुळे दातांनाही धोका पोहोचतो.
* प्रत्येकवेळी एकाच जागी टूथपिकचा वापर होत राहिला तर दातांमधील फट वाढत जाते आणि तिथे अन्नकण अडकत राहतात. यामुळे दातांमध्ये कॅविटी होण्याचा धोका बळावतो.
* बर्याच जणांना टूथ पिक चावत बसण्याचा नाद असतो. मात्र, ही बाब दातांवरील सुरक्षा आवरणाला धोका पोहोचवणारी ठरते. प्लास्टिक अथवा लाकडाची टूथ पिक चावत राहिल्याने हे आवरण नाहीसे होते.
* अडकलेले अन्नकण जोर देऊन काढण्याच्या प्रयत्नात दातांच्या मुळांना धोका पोहोचू शकतो. दातदाढा आपल्या जागेवरुन हलतात आणि मुळे बाहेर येतात. यामुळे कमालीच्या वेदना सोसाव्या लागतात.
* दररोज टूथपिकचा वापर होत राहिल्यास दातांची चमक नाहिशी होते. दात पिवळसर दिसू लागतात.
* जास्त काळपर्यंत दातांमध्ये अन्नकण अडकून राहिले आणि नंतर टूथपिकच्या साह्याने काढले तरी तोंडाचा दुर्गंध कमी होत नाही. शिवाय टूथपिकने जखमझाल्यास अन्न-पाणी घेताना वेदना सहन कराव्या लागतात.
* टूथपिक अस्वच्छ आणि अयोग्य ठिकाणी ठेवलेली असल्यास ती तोंडात घातल्याने अनेक घातक विषाणू आणि जिवाणू तोंडात प्रवेश करतात. ही बाब काही रोगांना कारक ठरु शकते.